Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २५ जानेवारी, २०२१
अकोल्यात लग्नाच्या नावाने फसवणूक कारणाऱ्या चौघांना अटक..!
अकोला प्रतिनिधी:लग्न लावून देतो, असे सांगून बनावट नातेवाईकांच्या समोर मुलीचे मुलासोबत लग्न लावून देऊन मुलाकडून लाखो रुपये उकळणाऱ्या चौघांना डाबकी रोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चौघांना न्यायालयाने 29 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकाराचा भांडाफोड केल्याने या चौघांनी फसविलेली आणखी प्रकरणे समोर येणार आहेत.
तक्रारदार राहुल विजय पाटील यांना लग्नासाठी सुदाम करवते याने पातूर बसस्थानकावर बोलवले. नंतर राहुल यांना व इतर नातेवाईकांना अकोल्यातील अन्नपूर्णा माता मंदिर, डाबकी रोड येथे मनीषा पाटील या नावाची मुलगी दाखवण्यात आली. ही मुलगी राहुलला पसंत आली. त्यानंतर लग्न लावून देण्यासाठी सुदाम करवते याने त्यांना एक लाख 60 हजार रुपयाची मागणी केली. तसेच, पातूर येथील मुलीकरिता एक लाख 30 हजार रुपयांची मागणी केली. नंतर राहुल यांचे मनीषाशी लग्न झाले.
त्यानंतर राहुल व त्यांचे नातेवाईक मनीषा बरोबर आपल्या वाहनाने निघून गेले. नंतर प्रभात किड्स शाळेजवळ आरोपींच्या साथीदाराने राहुल यांच्या गाडीला कट मारला व त्या कारणातून त्यांच्याशी वाद घातला. यावेळी संधीचा फायदा घेत मनीषा ही गाडीमधून बाहेर आली आणि वाद घालणाऱ्या साथीदारासोबत दुचाकीवर पळून गेली.
या प्रकरणात सुदाम करवते व त्यांच्या साथीदाराने फिर्यादी राहुल यांची एक लाख 30 हजार रुपयांनी फसवणूक केली. नंतर राहुल यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नंतर सुदाम करवते हा अकोला पंचायत समिती जवळ असल्याच्या माहितीवरून त्यास व त्याच्यासोबत चार ते पाच जणांना डाबकी रोड पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीमध्ये सुदामचे खरे नाव गुलाब नारायण ठाकरे असल्याचे त्याने सांगितले.
तसेच, या अगोदर फसवणूक झालेल्या अतुल सोनवणे पाटील यांच्याकडून घेतलेल्या दीड लाखातील 20 हजारात त्यांनी बनावट दुसरे आधारकार्ड बनविले. डाबकी रोड पोलिसांनी यामध्ये शंकर बाळू सोळंके, संतोष उर्फ गोंडू सीताराम गुडधे, हरिसिंग ओंकार सोळंके यांना अटक केली आहे. यातील चारही आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर डाबकी रोड पोलिसांनी चौघांना न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने या चौघांना 29 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
दिंडोरी (प्रतिनिधी) माधव खाबिया :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज बुधवार दि.३१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास येथील शेतकरी ...
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा