Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१

शिरपूर भाजपाचे महावितरणमध्ये तीन तास ठिय्या आंदोलन अनेकांचे विजपुरवठा खंडित ग्राहकांना सवलत द्यावी..!बबनराव चौधरी..!



शिरपूर प्रतिनिधी : लाॅकडाऊनच्या काळातील वीजबिल माफ होणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे त्यामुळे विज वितरण कंपनीने वसुली मोहिम हाती घेतली आहे. अनेकांनी वीजबिल भरलेले नाही त्यामुळे वीज कंपनीने थकबाकीदारांच्या वीजपुरवठा सुचना न देता खंडीत करण्याचे धोरण स्वीकारले आहे. गेल्या काही दिवसात पासुन अनेकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. 

अनेक ग्राहकांना विजबिल हप्ते करुन मिळत नाहीत त्यात काही ग्राहकांनी अर्धी रक्कम भरण्याची तयारी दर्शवुन हि त्यांची जोडणी कापणे, ५० टक्क्यांहुन अधिक बिल भरण्यासाठी सक्ती करणे आदि प्रकार घडत आहेत अशी तक्रार विजग्राहकांनी भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचाकडे केली होती. म्हणुन भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, तालुकाध्यक्ष किशोर माळी,शहराध्यक्ष हेमंत पाटील, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी आदि पदाधिकारींनी येथील महावितरणच्या कार्यालयात (दि.११ फेब्रु) रोजी तीन तास ठिय्या आंदोलन करत विजपुरवठा खंडित करु नका,खंडित पुर्वी पुर्वसुचना द्यावी, विज ग्राहकांना सवलत द्यावी अशी मागणी लावुन धरली. 

यावेळी ग्रामिण विभागाचे उपअभियंता नेमाडे, शहरचे उपअभियंता डि. एम. पाटील, कनिष्ठ सचिन पाटील, बडे यांच्याशी चर्चा करुन विजग्राहकांना सवलत देत त्यांना हप्ते करुन द्यावीत तसेच विज कापणी आधी पुर्वसुचना द्यावी अशी मागणी भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी केली तसेच त्यांनी आमदार काशिराम पावरा, प्रांतधिकारी डाॅ. विक्रम बादल, तहसिलदार आबा महाजन यांच्याशी संपर्क करुन वीज बिलांच्या समस्येची माहिती दिली. विज जोडणी कापणीचे प्रकार थांबवावेत अन्यथा ग्राहकांचा मोर्चा आणण्याचा इशारा देण्यांत आल्यावर अधिकार्‍यांनी हप्ते करुन देवु व पुर्वसुचना देवु असे आश्वासन दिली. 

यावेळी व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, संजय आसापुरे, जितेंद्र सुर्यवंशी, सुनिल चौधरी, महेंद्र पाटील, रोहित शेटे, मुबीन शेख, बापू लोहार, रविंद्र भोई, विक्की चौधरी, राधेश्याम भोई, प्रभाकर कोळी,राजुलाल मारवाडी,अविनाश शिंपी, जितेंद्र पाटील, जगन्नाथ पाटील,भालेराव माळी, नारायण माळी, रविंद्र सोनार,मनोज भावसार, जितेंद्र माळी, अतुल माळी, अजय कदम, राहुल पावरा आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध