Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

अमळनेरचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांचा...!मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन चा जनतेसाठी संदेश..!



लॉक डाऊन काळात अमळनेरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या कार्यकाळात अनेक कर्तव्यात कसूर केल्याचे प्रकरण जनतेच्या समोर आले त्यात
●ज्योती भोई आत्महत्या प्रकरण
●दहिवद येथील पोक्सो कायदा अंतर्गत दाखल प्रकरण
●शेवटी अमळनेर नगरपालिकेचे बॅनर प्रकरण या सर्व प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचे लक्षात येवून त्यांची तडकाफडकी बदली जळगाव येथे कंट्रोल रूमला करण्यात आली पण जिल्ह्यातील मोठ्या राजकीय पुढाऱ्याच्या हस्तक्षेपा नंतर ते तालुक्यातील लोकप्रतिनिधीच्या नाकावर टिचून पुन्हा अमळनेर पोलीस स्टेशनला हजर झालेत.

आज पुन्हा नाट्यमय रित्या त्यांच्या जागेवर जळगावचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत हजर झाले असून ...अंबादास मोरे मी पुन्हा येईल ...मी पुन्हा येईल हे सांगून पुन्हा अमळनेर मध्ये येतात का ? याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

या निमित्ताने एक गोष्ट मात्र निश्चित सर्वसामान्य जनतेसाठी ही शासकीय प्रणाली नसून सर्व खेळ हा राजकीय लोकांच्या इशाऱ्यावर चालतो .
या सर्व नाट्यमय घडामोडी नंतर अखेर पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी अमळनेर पोलीस स्टेशनचा पदभार घेतला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध