Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१
सरपंच, उपसरपंच यांनी मिळालेल्या संधीचे सोन कराव..!आ.काशिराम दादा पावरा..!
जिप,पंसत गावविकासाचा आराखडा सादर करावा..! बबनराव चौधरी..!
शिरपूर प्रतिनिधी : राजकारणाच्या तुलनेत समाजकारण आणि विकास कामांना अधिक महत्व असते. सरपंचावर राजकीय पक्षाचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचांनी राजकारणात मिळालेल्या संधीचं सोनं करून सर्वसामान्य जनतेत आपली प्रतिमा निर्माण करावे असे प्रतिपादन आ. काशिराम पावरा यांनी केले.
येथील भाजपा कार्यालयात (दि.२५ फेब्रु) रोजी आयोजित नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांसह सदस्यांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी हे होते. याप्रसंगी भाजपा बुथ संपर्क अभियान जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हा विभागीय संयोजक म्हणुन भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांना विशेष जबाबदारी पक्षाकडुन मिळाल्या बद्दल त्यांचा हि सत्कार आ. काशिराम पावरा यांचा हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, भाजपा अनु. जाती मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, सरपंच संघटना तालुकाध्यक्ष भास्कर बोरसे आदिंची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती. भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी म्हणाले की, निवडणुकीच्या काळातील मतभेद विसरुन गाव विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. धुळे जिल्हा परिषद व शिरपूर पंचायत समितीमधे भाजपाची सत्ता आहे तसेच खासदार, आमदार हि भाजपाचे आहेत त्यांचा निधीतुन आपण आपल्या ग्रामपंचायतीला गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सरपंच, उपसरपंच यांनी विकास आराखडा तयार करुन जिप, पंसत सादर करावा तसेच नुकताच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वसामान्य जनतेने विकासाच्या दृष्टीने मोठ्या विश्वासनाने आपल्याला सरपंच, उपसरपंच पदावर बसविले आहे.
याचीच जाणीव ठेवून सरपंच, उपसरपंचनी जनतेच्या विश्वासाला तडा जावू न देता विकासाचे काम करावे असे आवाहन हि त्यांनी यावेळी केले.वाठोडा सरपंच नारायण चौधरी,उपसरपंच सौ.वंदनाबाई कोळी,दहिवद सरपंच सौ.स्मिता लक्ष्मीकांत पाटील,उपसरपंच विठाबाई चौधरी, शिंगावे सरपंच सौ. मंजुराबाई पाटील,उपसरपंच चंद्रकांत (भुरा) पाटील,जातोडा सरपंच सौ. रत्नाबाई धनगर, उपसरपंच सौ.प्रतिभाबाई राजपूत, सावळदे सरपंच अनिल महाजन, उपसरपंच सचिन राजपूत, बाभुळदे सौ. भिमाबाई दोरीक,उपसरपंच संजय पाटील, हिंगोणी सरपंच सोमा भिल,उपसरपंच सौ. कल्पनाबाई पाटील, बोरगाव सरपंच काशिबाई भिल, उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, बाळदे सरपंच मंदा भिल, उपसरपंच निंबा पाटील, गरताळ सौ. सुनंदाबाई ठाकरे, उपसरपंच करण शिंदे, भाटपुरा सरपंच सौ. ललिता चव्हाण, उपसरपंच रोशन सोनवणे, भावेर सरपंच सौ. रंजना धनगर, उपसरपंच जदिना मौले, घोडीसगांव सरपंच सौ. उषाबाई गुजर, उपसरपंच पिंताबर धनगर आदि गांवाचा सरपंच, उपसरपंचाचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन सत्कार आ. काशिराम पावरा व प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचा हस्ते करण्यात आला. तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील यांनी हि मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस जितेंद्र सुर्यवंशी,तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील,भाजपा जिल्हा सदस्य जगतसिंग राजपुत, तालुका चिटणीस सुनिल चौधरी, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, कुवे अध्यक्ष सतिश गुजर, हिंगोणी अध्यक्ष जितेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते दशरथ महाजन, राजेंद्र पाटील, प्रभाकर कोळी, राजुलाल मारवाडी, मनोज भावसार, शिंगावे माजी उपसरपंच गुलाबराव पाटील, जातोडा ग्रा.पं सदस्य रविंद्र राजपुत, कुवे ग्रा.पं सदस्य राहुल गुजर,भटु गुजर, गरताडचे राकेश सोनवणे, सारीश पाटील, रहिम खाटीक, श्रावण चव्हाण, गरबड भिल, माधव दोरीक, मोहनसिंग राजपुत, विनोद पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा