Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१
परंडा: चिंचपूर (बु) ग्रामपंचायत सत्येच्या चाव्या सावित्रीच्या लेकीच्या हाती...
परंडा (राहुल शिंदे) दि.13 तालुक्यातील चिंचपूर (बु) येथील प्रतिष्ठेच्या व संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असेलेल्या, ग्रामपंचायतवर 70वर्षाच्या इतिहासात प्रथमच भाजपा ची सत्ता आली आहे. आ.सुजितसिंह ठाकूर,आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाने व भाजपा तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील,भाजयुमो तालुका अध्यक्ष अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सत्ता भाजपाने 7- 4च्या फरकाने खेचून आणली.
सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुष पडलेले असताना देखील गावाने महीला सबलीकरणाचा विचार सत्यात उतरवण्याच्या दृष्टीने जनशक्ती परिवर्तन पॅनलच्या प्रमुख परंडा पंचायत समिती सदस्या सौ.अश्विनी सतिश देवकर यांनी ग्रामपंचायतच्या सत्तेच्या चाव्या सावित्रीच्या लेकीच्या हाती देऊन नारी शक्तीचा मोठा सन्मान केला आहे,सर्व सामन्य कुटुंबातील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या पाच महिला चालवणार आहेत चिंचपूर बु.चा विकासरथ,
सरपंच पदी सौ.प्रियंका पोपट शिंदे,तर उपसरपंचपदी सौ.द्वारकाबाई गोवर्धन सावंत यांची वर्णी लागली तर, सौ.शितल दत्तात्रय सुतार, सौ.भाग्यश्री भारत देवकर, सौ.विद्या प्रकाश सावंत,महेश भागवत देवकर, भगवत कोंडीबा शिंदे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
कायद्याने महिलांना 50%आरक्षण दिले आहे पण आज चिंचपूर (बु)ग्रामस्थांनी 100% महिलाराज केले आहे, फुलांच्या पाय-घड्या घालून विजयी महिलांचे पुरुषांकडून स्वागत करण्यात आले.
भाजपा चे सर्वसाधारण पुरुष जागेवर निवडुन आलेले महेश देवकर व भागवत शिंदे यांनी पदाची अपेक्षा न करता महिलांच्या हाती सत्ता देऊन खरा पुरुषार्थ दाखवला आहे.
त्यांच्या निस्वार्थी वृत्तीच सर्वञ कौतुक होत आहे.
निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी अध्यासी अधिकारी म्हणून मा.संगमनेरकर साहेब यांनी काम पाहिले तर ग्रामसेवक लोखंडे, तलाठी नागलोट यांनी सहकार्य केले तर,शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम आंबी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर व पोलीस टीमने पाहिले.
यानंतर ग्रामस्थांच्यावतीने उमेदवारांचा नागरी सत्कार करण्यात आला, भाजपा जिल्हाअध्यक्ष नितीन काळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी अभिनंदन केले.
यावेळी भाजपा ता.अध्यक्ष राजकुमार पाटील,भाजपा युवानेते संकेत ठाकूर,महावीर तनपुरे, विठ्ठल निपाले, बंटी ठाकूर, मदन दीक्षित, किरण पांडे, विलास मदने, दत्ता ठाकरे,सुग्रीव कदम, रेवण आरे, हरिभाऊ देवकर, रामभाऊ झांबरे,संजय अनभुले,सुरेश मोरे,सतिश शिंदे, विजय देवकर, सिद्धार्थ सावंत,मारुती सावंत, बाबू दारुळे, सोमनाथ दारूळे, तानाजी कासारे,हनुमंत सुतार,समाधान चव्हाण,राजाभाऊ देवकर, सर्जेराव शिंदे, अर्जुन शिंदे, तुकाराम शिंदे, पांडुरंग शिंदे, सोपान मल्हारे,नितीन सुरवसे,भारत भिलारे, सुभाष झांबरे,प्रमोद देवकर,किरण बोबडे ,ओम शिंदे, साधू कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थितीत होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा