Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१

कांदा अनुदान मिळो न मिळो, पण यामागचा पर्दाफाश झाला पाहिजे.दहिवद आणि पिंपळीचे शेतकरी कांदा अनुदान न मिळाल्याने हायकोर्टात जाणार.



पंकज पाटील (उपसंपादक, तरुण गर्जना) दहिवद आणि पिंपळी गाव मागील १०० वर्षापासून कांदा पिकवणारी गावं आहेत.
जेव्हा स्वत: ऑडिटर्सचे रिमार्क या प्रकरणावर तपासले, ते धक्कादायक होते. ओरिजनल-मूळ सौदापट्टी प्रकरणाला जोडली असेल, तरी तिथे लिहिले होते, सौदा पावती नाही.

प्रत्येक प्रकरणावर कारणं दिली असली, तरी ती एका दिवसात काही न पाहता दिलेली कारणं, शेरे आहेत.
आणखी एक शेरा होता, वाहन क्रमांक लिहिलेला नाही- आजही कृउबामध्ये कुणीही पावतीवर वाहन क्रमांक लिहित नाही.

शेतकऱ्यांनी तक्रार करूनही संबंधितांनी (लेखा परिक्षक) यांनी कोणतंही उत्तर दिलेलं नाहीत.

जेव्हा कृउबावर प्रशासक आला याच खात्याचा तेव्हा यावर उत्तर देण्यात आले, एवढे वर्ष का घेतले.ही प्रकरणं तपासून कृऊबाने ताब्यात घेतली, शेतकऱ्याने सर्व कागदं जोडून दिली.

ही सर्व प्रकरणं तपासणीसाठी समिती येणार होती, का आली नाही, अजूनही माहित नाही ?

जळगाव कृउबात एवढ्या प्रमाणात प्रकरण रिजेक्ट झाली का, ते देखील पाहावं लागेल.या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी दहिवद व पिंप्री येथिल कांदा उत्पादक शेतकरी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे समजले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध