Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

शासनाने जे शेतकरी कर्ज माफी पासून वंचित राहिले आहे त्यांच्यावर अन्याय करू नये...!मल्हारी शिवाजी कोकरे रा.ब्रम्हपुरी,ता. मंगळवेढा, जिल्हा सोलापूर



अर्जदार :- मल्हारी शिवाजी कोकरे मो. 9503777993 रा.ब्रम्हपुरी,ता. मंगळवेढा, जिल्हा सोलापूर

मा.भारत वागमारे साहेब  उप जिल्हाधिकारी,सोलापूर याना निवेदन देताना

विषय : कर्ज माफी मिळणेबाबत…
महोदय,वरील विषयास अनुसरून विनंती अर्ज करतो की मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथील दिनांक 21/12/2019 या दिवशी बैठक पार पडली होती. त्यात महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजने अंतर्गत दि. 30 सप्टेंबर 2019 पर्यन्त सर्वच शेतकर्‍यांना सरसकट रु. 2 लाख पर्यंतची कर्जमाफी ची घोषणा केली होती २०१९हिवाळी अधिवेश संपून हिवाळी २०२०चे अधिवेशन संपले तरी अजून शेतकर्‍याची पूर्ण कर्ज माफी झाली नाही. काही ठराविक शेतकर्‍यांनाच कर्ज माफी भेटली आहे.
1 एप्रिल 2015 ते 30 सप्टेंबर 2019 मधील सर्वच कर्ज माफी झाली आहे आणि 1 एप्रिल 2015 च्या आधीचे शेतकरी आहे. आणि दोन लाख रुपये वरील शेतकऱ्यांना अजून कर्ज माफी मिळाली नाही. कारण शासनाचा जी आर 4564136 या नुसार अनेक शेतकरी कर्ज माफी पासून वंचित राहिले आहे शासनाने नवीन जीआर काढण्यात यावा नाहीतर आहे त्या जी आर मध्ये बदल करून जे शेतकरी 1 एप्रिल 2015 चे आधीचे आहे त्यांना कर्ज माफी देण्यात यावी . जे शेतकरी कर्ज माफी पासून वंचित राहिले आहे त्यांना कर्ज माफी मिळावी. मूळ कर्ज थकीत असलेने बँक नव्याने कर्ज देत नसल्यामुळे आणि जमीनदार व शेतकरी यांना ही बँक कर्ज देत नसलेने आणि बँकेचे अधिकारी जमीनदार व कर्जदार यांना जास्त त्रास देत आहेत. शासनाने जे शेतकरी कर्ज माफी पासून वंचित राहिले आहे त्यांच्यावर अन्याय करू नये. सर्वात जास्त आत्महत्येत 2020 मध्ये जाले आहेत .कारण शासनाने काढलेल्या जीआर नुसार अनेक शेतकरी पात्र ठरत नाही यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत.

आधीच्या सरकारने काही शेतकर्‍यांची कर्ज माफी झाली असेल तरी दीड लाख रुपये माफी करून राहिलेले कर्ज सतत कोरडा दुष्काळ ओला दुष्काळ रोगराई हमी भाव नसलेने या सर्व कारणाने शेतकरी लवकर कर्ज शकला नाही. आणि बँकेचे व्याज नियमित असेल तर 7% व थकीत असलेवर ११% आणि चक्रवाढ व्याज असेलेने बँकेचं कर्ज झपाट्याने वाढत असलेने शेतकर्‍यांवर कर्जाचा बोजा जास् झालेने आणि बँकेचे सतत फोन येतात त्यामुळे शेतकरी यांना दुसरा पर्याय राहिलेला नाही शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहे शासनाने याचा विचार करावा राहिलेले शेतकरी यांना कर्ज माफी देण्यात यावी. मुलांचे शिक्षण आणि मुलींची लग्ने या मुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्ज बाजारी होत आहे.
त्यामुळे जे शेतकरी कर्ज माफीपासुन वंचित राहिले आहेत त्यांना कर्ज माफ व्हावे व पुन्हा नव्याने कर्ज मिळावे.
असे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत त्यांना कर्जमाफी मिळावी ही विनंती.

आपला विश्वासू,
मल्हारी शिवाजी कोकरे
प्रत माहितीसाठी,
1. मा. उद्धवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
2 अजित दादा पवार साहेब उपुख्यमंत्री
3. मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, विरोधी पक्षनेते.
4. मा. दादा भुसे साहेब कृषी मंत्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध