Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१
भाजपा बुथ संपर्क अभियान विभागीय संयोजकपदी बबनराव चौधरी..!
शिरपूर : भारतीय जनता पार्टी बुथ रचना व संपर्क अभियान सध्या देशभर सुरु असुन हे अभियान यशस्वी होण्यासाठी पक्ष नेत्यांकडुन जबाबदार्या दिल्या गेल्या आहेत. जळगाव, धुळे नंदुरबार जिल्हा भाजपा बुथ संपर्क अभियान विभागीय संयोजकपदी बबनराव चौधरी यांचावर हि विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटन सरचिटणीस विजयराव पुराणिक, भाजपा उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटनमंत्री रविंद्र अनासपूरे, बुथ व शक्ती केंद्र रचना अभियान प्रदेश संयोजक डाॅ. रामदास आंबटकर यांनी नुकतीच भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचावर हि विशेष जबाबदारी सोपवली आहे.
बबनराव चौधरी यांनी पक्षात यापुर्वी विविध जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ते पक्षात गेल्या ४० वर्षापासुन कार्यरत असुन त्यांनी जिल्हाध्यक्ष असतांना अतिशय उत्कृृष्ट कामगिरी केली होती. सध्या पक्षात प्रदेश सदस्य व नंदुरबार जिल्हा प्रभारी म्हणुन काम पाहात आहेत आता त्यांना पक्षाकडुन जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हा बुथ संपर्क अभियान विभागीय संयोजक म्हणुन विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाने बबनराव चौधरी यांचावर हि विशेष जबाबदारी सोपवल्या बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा