Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१
बोरगाव येथे वर्धिणी आमसभा संपन्न..!
शिरपुर प्रतिनिधी:दि 27/02/2021 रोजी वनावल प्रभागातील बोरगाव या गावामध्ये उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत वर्धिणी आमसभा, जिल्हा अभियान व्यवस्थापक (DMM) श्री उद्धव धारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
बैठकीला गावातील सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, वनावल प्रभागाचे प्रभाग समन्वयक दत्तात्रय खराडे, पोलीस पाटील मनोहर पाटील, साक्री तालुक्यातील वर्धिनी रीमा बच्छाव, शितल देसले, राजश्री पवार नंदिनी अहिरे व ग्रामस्थ महिला उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागा तर्फे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष डी.आर.डी.ए व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती शिरपूर मार्फत 13 ते 27 फेब्रुवारी 2021 दरम्यान 15 दिवसीय निवासी वर्धिनी फेरी शिबीर घेण्यात आले होते.
जिल्ह्यात वर्धिनी म्हणून निवड झालेल्या वर्धिनी गावात 15 दिवस मुक्कामी राहून गावातील पात्र गरीब कुटुंबांचे सर्व्हेक्षण करून महिलांचे स्वयं सहाय्यता समूह तयार केलेत.
धुळे येथुन आलेले जिल्ह्याचे जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री उद्धव धारणे यांनी उपस्थित महिलांना दशसुत्री उपजीविका,पंचायतराज संस्थांमध्ये घ्यावयाचा सहभाग,ग्रामंसंघाचे महत्व, गरज,भविष्यात होणारे फायदे,ग्रामसंघाच्या समित्या,त्यांचे महत्त्व,जबाबदार्या तसेच गावात अभियान सुरू झाल्यानंतर महिलांनी गरीबी उच्चाटनासाठी घ्यावयाचा पुढाकार यावर मार्गदर्शन केले.
यावेळी बोरगावचे सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी 15 दिवस आपले कुटुंब सोडून गावात राहणाऱ्या वर्धिनींचे व उमेद अभियाना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच गावातील ग्रामस्थ महिलांनी ही खरी महिला सक्षमीकरण व महिलांचे प्रश्न महिलांच्या व गावाच्या सहभागाने सोडण्याचे अभियान असल्याचे प्रतिपादन करून सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान केले. प्रभाग समन्वयक दत्तात्रय खराडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सर्व महिलांच्या अनुमतीने बोरगाव समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून म्हणून सौ वैशाली मनोहर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. आभार रीमा शरद बच्छाव रा. दहीवेल ता. साक्री यांनी केले. वर्धिनी राऊंड चे आयोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वान्मथी मॅडम, प्रकल्प संचालक श्री. बी. एम. मोहन, शिरपूर गटविकास अधिकारी शिंदे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा