Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
उद्या पासून सरकारचं बजेट अधिवेशनाला सुरवात होतं असून अधिवेशनात हा मुद्दा गाजणार या आधीच मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा...!
उद्या पासून सरकारचं बजेट अधिवेशनाला सुरवात होतं असून अधिवेशनात हा मुद्दा गाजणार या आधीच मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा...!
मुंबई (प्रतिनिधी) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी आज दुपारी राजीनामा दिला असून तो आजच मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांनी मंजूर देखील केला आहे.
आज दुपारी राजीनामा पत्र घेऊनच संजय राठोड हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
दरम्यान, शिवसेनेनं संजय राठोड यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतला होता . संजय राठोड यांनी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटीसाठी वेळ मागितली होती. पण त्यांनी ती नाकारली होती. त्यामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट झाले होते.
उद्या पासून सरकारचं बजेट अधिवेशनाला सुरवात होतं असून अधिवेशनात हा मुद्दा गाजणार होता असं चित्र दिसत होते मात्र एक दिवस आधीच मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर झाला असल्याने राजीनामा मागणीचा मुद्दा आता मागे पडला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा