Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३ मार्च, २०२१
Home
/
Unlabelled
/
“मुख्यमंत्री ग्राम सडक योजने" अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील पुलांच्या कामासाठी 37 कोटी 15 लाख निधी मंजूर.
“मुख्यमंत्री ग्राम सडक योजने" अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील पुलांच्या कामासाठी 37 कोटी 15 लाख निधी मंजूर.
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.3 माहे-ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक पुल वाहुन गेले आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील वाहून गेलेले पुल दुरुस्ती करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख-पाटील यांच्या कडे माजी मंत्री आ.प्रा. तानाजीराव सावंत, आ.ज्ञानराज चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील यांच्या समवेत खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मागणी केले होती. “मुख्यमंत्री ग्राम सडक योजने" अंतर्गत 2020-21 या वर्षी जिल्ह्यातील एकुण 13 पुलांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.
यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील रा.म.मा.52 उस्मानाबाद ते उपळा (मा) रस्ता कि.मी.0/00 ते 5/00 सा.क्र.4/500 वर बुडीत पुलाचे बांधकाम करणे. 2 कोटी 14 लाख, सारोळा ते शिंदेवाडी रस्ता कि.मी.0/00 ते 5/470 सा.क्र.0/400 वर बुडीत पुलाचे बांधकाम करणे. 1 कोटी 49 लाख, तुळजापूर तालुक्यातील रा.मा.9 नळदुर्ग-चिकुंन्द्रा- किलच रस्ता कि.मी.0/00 ते 14/900 सा.क्र.11/656 वर बुडीत पुलाचे बांधकाम करणे. 2 कोटी 36 लाख, रा.म.मा 65 ते मुळेवाडी शेटे तांडा रस्ता कि.मी.0/00 ते 2/700 सा.क्र.1/200 वर बुडीत पुलाचे बांधकाम करणे. 1 कोटी 76 लाख, कळंब तालुक्यातील प्रजिमा-19 ते निपाणी-पाडोळी रस्ता कि.मी.0/00 ते 10/600 सा.क्र.10/100 वर बुडीत पुलाचे बांधकाम करणे. 3 कोटी 28 लाख, भोसा ते गौर माळी वस्ती सा.क्र.0/510 वर उच्च स्तरीय पुलाचे बांधकाम करणे. 2 कोटी 91 लाख, कोथळा ते गायरान वस्ती सा.क्र.0/710 वर उच्च स्तरीय पुलाचे बांधकाम करणे. 2 कोटी 59 लाख, रा.मा.236 हिंगणगाव-आवाड शिरपुरा- सौन्दना(आ) रस्ता कि.मी.0/00 ते 14/00 सा.क्र.9/50 वर बुडीत पुलाचे बांधकाम करणे. 3 कोटी 91 लाख, भूम तालुक्यातील तित्रज ते मुरूम कर वस्ती-साबळे वस्ती सा.क्र.0/800 वर उच्च स्तरीय पुलाचे बांधकाम करणे. 2 कोटी 46 लाख,परंडा तालुक्यातील प्रतिमा-01 ते श्रीधरवाडी-मस्केवस्ती रस्ता कि.मी.0/00 ते 2/200 (L-71) ता.परंडा सा.क्र.1/00 वर बुडीत पुलाचे बांधकाम करणे. 2कोटी 8 लाख, रा.मा.210 ते इंनगोंदा वाटेफळ- लोणारवाडी-तांदुळवाडी-कोकरवाडी जिल्हा सरहद्द ता.परंडा सा.क्र.3/500 वर बुडित पूलाचे बांधकाम करणे. 5 कोटी 43 लाख, लोहारा तालुक्यातील प्रतिमा -41 ते कमालपूर सा.क्र.2/200 वर उच्च स्तरीय पुलाचे बांधकाम करणे. 4 कोटी 28 लाख, उमरगा तालुक्यातील टी-09 ते कोथळी ता.उमरगा सा.क्र.0/800 वर उच्च स्तरीय पुलाचे बांधकाम करणे. 2 कोटी 34 लाख अशा एकूण 13 पुलांच्या कामांसाठी “मुख्यमंत्री ग्राम सडक योजने" अंतर्गत 37 कोटी 15 लाख निधी मंजूर झाले असून लवकरच कामे सुरू होणार आहेत. त्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्त व अर्थमंत्री अजित पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख-पाटील तसेच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मनःपूर्वक आभार!
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा