Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३ मार्च, २०२१
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची भाषणे कोण लिहून देतो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची भाषणे कोण लिहून देतो अशी विचारणा माहिती अधिकार कायद्याखाली करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज कुठे ना कुठे कोणत्या तरी विषयाला अनुसरुन भाषण देत असतात. त्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट कोण लिहून देतो अशा आशयाची विचारणा इंडीया टूडेच्या माध्यमातून करण्यात आली होती.
त्यांची भाषणे लिहून देणा-या व्यक्तींची नावे आणि फोन अथवा मोबाईल क्रमांकाच्या माहितीसह त्याकामी किती मोबदला दिला जातो याची देखील मागणी माहिती अधिकार कायद्याखाली करण्यात आली होती.
पंतप्रधानांना भाषण देण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती जमा करुन दिली जाते. त्या माहितीच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:च भाषणाचा मजकूर तयार करतात अशी माहिती उत्तरादाखल देण्यात आली आहे. जसा कार्यक्रम असेल त्यानुसार माहितीचे स्वरुप त्यांना देण्यात येते. त्याकामी किती खर्च येतो याचा खुलासा मात्र दिला गेला नसल्याचे सांगीतले जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा