Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २ मार्च, २०२१
सन्मान कोविड योद्धांचा...."द रिअल कोरोना योद्धा" या सन्मानाने गौरव..!
(कृष्णा महाजन,एरंडोल तालुका प्रतिनिधी)
आपली जीवाची पर्वा न करता जे जीवनाच्या रणांगणावर कोविड सारख्या महाभयंकर बकासुराशी लढले आणि अनेकांचे आयुष्य रक्षिले त्या शुर कोविड योध्दांच्या कार्याचा,धर्याचा,शौर्याचा,शर्थिंचा गौरव म्हणून मानव सेवा बहुउद्देशीय संस्था एरंडोल अध्यक्ष तथा आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या वतिने आज दिनांक 1रोजी 35 कोविड योद्धाचा... "द रिअल कोरोना योद्धा" या सन्मानाने गौरविण्यात आले. त्यावेळी, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी साहेब, तहसिलदार अर्चना खेतमाळीस,लोकायुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी,कृषी उत्पन्न बाजार समिती पारोळाचे सभापती अमोल दादा पाटील, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव साहेब, आरोग्य अधिकारी डॉ फिरोज शेख, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, किशोरभाऊ निंबाळकर, रविंद्र अण्णा महाजन, राजेंद्र आबा चौधरी, शिवसेनेचे जेष्ठ नेते रमेश अण्णा महाजन, डी.डी.एस कॉलेजचे चेअरमन अमित दादा पाटील, नगरसेवक प्रा मनोज पाटील, अनिस अध्यक्ष प्रा आर एस पाटील शिवसेना युवा नेते आनंदा चौधरी (भगत),तेली समाजाचे अध्यक्ष गुलाब चौधरी, डॉ राहुल वाघ, फकिरा खोकरे,अतुल जगताप, प्रकाश सिरसे, बिरजू सिरसे, मुख्तार शेख, दिपक सोयते आदी उपस्थित होते...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा