Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २ मार्च, २०२१
संतनगरीत शुकशुकाट!
शेगाव प्रतिनिधी : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. शुक्रवारी संध्याकाळ पासून कडक संचारबंदी लागू
करण्यात आली. या आवाहनाला
नागरिकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असल्याने संतनगरीत शुकशुकाट दिसून
येत आहे. शेगाव येथे मध्यंतरी
कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती.
कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव
लक्षात घेता येथील बाजारपेठ दुपारी ३
वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात आली होती.
पण गत काही दिवसांपासून जिल्ह्यात
कोरोना विषाणू संसर्गचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भावक्षरोखण्यासाठी जिल्ह्यात
दुकाने उघडण्याची वेळही सकाळी
९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच ठेवण्यात
आली आहे. दरम्यान शुक्रवारी संध्याकाळ पासूनच कडक संचारबंदी लागू
करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या
आदेशाने दूध डेअरीला नियोजित वेळेत
सूट देण्यात आली होती.
दरम्यान, वाढीव संचारबंदीला शनिवारी ,रवीवारी शेगाव शहरातील नागरिकांनी
उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोरोनाचा
धोका वाढल्याने नागरिकांनी बाजारपेठेत, तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये,असे आवाहन स्थानिक प्रशासनासह आरोग्य विभागाने केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले सार्वजनिक ठिकाणी तसेच बाजारपेठेत शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.
सध्या शेगावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचेक्षवातावरण आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत .
चौकट :- नागरिकही सकारात्मक
-प्रशासनाचे आवाहन नागरिकही
सकारात्मक घेत असल्याने बाजारपेठेतील
गर्दी टळल्याचे दिसून येत आहे.
- नागरिकांनी बाजारपेठेत किंवा
सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर
करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे
पालन करावे, हात वारंवार धुवावेत,
असे आवाहन स्थानिक प्रशासनासह
आरोग्य विभागाने केले आहे ....
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा