Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ८ मार्च, २०२१

स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करता करता स्त्री चे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची जणू स्पर्धाच



स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करता करता स्त्री चे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची जणू स्पर्धाच लागले.निसर्गाची किमया न्यारी आहे. उत्क्रांती वाद सजीवांना नर मादी मध्ये जसे विभागते, तसेच नर मादी ला एकत्र करून वेगळी उत्पत्ती ही करते. तसेच काही सजीवांमध्ये दुसऱ्या जोडीची मदत न घेता ही नव्या जीवाची उत्पत्ती होते आणि हे सप्रमाण सिद्ध आहे. स्त्री चे स्त्री त्व जर माता होण्यात पूर्ण होत असेल तर ते पुरुषांवर देखील तेवढेच अवलंबून आहे हे विसरून चालणार नाही. 

9 महिने पोटात वाढविणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून निसर्गाने दिलेली जबाबदारी पेलन्याशिवाय त्याला गत्यतर नाही. अनेक सजीवांमध्ये मादी कैक प्रकारे पिल्लांना जन्म देतच असतात. कर्तव्य निभावताना पुरुष सुद्धा कुठेही कमी पडत नाही. दुखणे खूपणे, त्रास त्यालाही आहेच, त्याचा त्याने कधी बागुलबुवा केलेला दिसत नाही.
आजकाल जणू fad च बनलंय, स्त्री शक्ती, अबला नारी, मातृ दिन, महिला दिन, स्त्री शक्तीचा जागर वगैरे...
समानतेच्या गोष्टीत पुरुषांना प्राधान्य नाकारून कशी स्त्री पुरुष समानता साधणार हा प्रश्नच आहे.

एक बाप म्हणून, नवरा म्हणून, मुलगा म्हणून कर्तव्य बजावताना आटणारे अश्रू, अपमानाचे घोट, उपाशी तापाशी राहून कुटुंबासाठी कमावलेले धन, संकटसमयी नेहमीच निधड्या छातीने पहाडासारखा संकट झेलणारा पुरुष नेहमीच दुर्लक्षित, उपेक्षित राहिलाय. अनेक वेळा ठराविक गोष्टींचा बाऊ करून समाजात कशी पुरुष प्रधान संस्कृती आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. मुळातच स्वभाव, संपत्ती, नोकरी व्यवसाय पाहून नाते जोडणारे स्वतःचे स्वार्थ कसे लपवतात हे समाजमान्य होतच नाही. कधी समाज श्रेष्ठ दाखवण्याचे कार्यक्रम, कधी भाषा श्रेष्ठ दाखवण्याचे आंदोलन, कधी स्त्री पुरुष भेद, कधी प्रांत भेद, कधी धर्म आणि संस्कृती वरून टीका...
मनुष्यच माणसा माणसात गट निर्माण करतोय. निसर्गाने मुळतहा भौगोलिक आणि जैविक विविधतेनुसार अश्या परस्पर पूरक रचना केल्या आहेत, त्या सकारात्मक स्वीकारून श्रेष्ठत्वाचा वाद बाजूला सारून, माणसाने माणुसकी धर्म कर्तव्याने निभावला तर अनेक समस्या चुटकिसरशी सुटतील. तसें न झाल्यास निसर्ग आपणांस आपली जागा दाखवण्यासाठी सक्षम आहे हे ही तितकंच खरं... काळानुरूप हवामान, भौगोलिक स्थिती, भाषा, संस्कृती, सर्व काही बदलत असतें. स्त्री पुरुष भेद बदलणे निसर्गाच्या हातात आहे आणि ते शक्य आहे हे नाकारता येणार नाही.

कधीतरी भाऊ, बाप, नवरा, मित्र अश्या रूपात पुरुषांचे कर्तव्य, त्यांची काळजी, त्यांचा त्रास, त्यांचा मान अपमान, त्यांचे स्वप्न, त्यांचा त्याग अनुभवावा.....

या पोस्ट मध्ये कुणालाही दुखावण्याचा हेतू नसून, निसर्गाने दिलेल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या कर्तव्य म्हणून स्वीकाराव्यात हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न आहे.... तसेच निसर्गाच्या वेगवेगळ्या रचना आपण आपल्यात भेद म्हणून स्वीकारल्या आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे...
© SURYAKANT_R.J.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध