Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ८ मार्च, २०२१
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना..!
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुचित करण्यात येते की,राज्यातील आदिवासी आणि अति दुर्गम भागांमध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा मिळणाऱ्या मानधनाच्या व्यतिरिक्त अतिरिक्त प्रोत्साहन म्हणून 100 रुपये व 75 रुपये देण्याचे शासनाने नियोजन केले आहे.
आदिवासी आणि दुर्गम भागामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना होणारा त्रास आणि त्यांना करावे लागणारे काम या बाबत संघटनेमार्फत शासन स्तरावर नेहमी चर्चा केली जात होती आणि त्या अनुषंगाने आज अशा आदिवासी आणि दुर्गम भागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाने अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता देऊन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले आहे त्याबद्दल शासनाचे आभार...
हे आपल्या संघटनेच्या पाठपुराव्याचे यश आहे...
सोबत:जी आर ची प्रत जोडत आहोत.
नेतृत्व
मायाताई परमेश्वर, रामकृष्ण बी. पाटील, युवराज पी. बैसाने, ॲड. गजानन थळे, दत्ता जगताप, सुमंत कदम, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे, सर्व संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते....
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा