Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ७ मार्च, २०२१

जामनेर शेतकरी सहकारी संघाचे काम प्रामाणिक: माजी मंत्री आ.गिरीश महाजन संचालक मंडळाच्या केले कौतुक



जामनेर प्रतिनिधी:शेतकरी सहकारी संघ लि.जामनेर यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज भव्य व्यापारी संकुल व मुख्य कार्यालय यांचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी माजी आ.मनीष जैन उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सभापती श्री चंद्रकांत बाविस्कर यांनी  सांगितले की सदर संकुलासाठी संस्थेचा एकही रुपया न घेता पुढील दुकान वीस लाख रुपये व मागील दुकान बारा लाख याप्रमाणे साडेतीन कोटी रुपये जमा केले आणि त्यातूनच पावणेतीन कोटी रुपयांमध्ये हे व्यापारी संकुल तयार केले आहे. 

यातून सुद्धा संस्थेकडे काही रुपये शिल्लक आहे. जेव्हा ही संस्था आमच्या ताब्यात आली तेव्हा संस्थेकडे एकही रुपया न होता तेव्हा ती क वर्गाची संस्था होती आज ती अ वर्गामध्ये प्रस्थापित आहे असेही चंद्रकांत बाविस्कर यांनी सांगितले.आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले की शेतकरी सहकारी संघाची अगोदरची परिस्थिती आणि आताची परिस्थिती या मधील फरक सांगितला ही संस्था शेतकऱ्यांची संस्था असून शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा या तत्त्वावर खते व साहित्य द्या जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल. शेतकरी संघाची जमीन ही दुसऱ्याच्या नावावर होती यात अनागोंदी कारभार चालू होता परंतु ती आपण शेतकीसंघाच्या नावावर करून आज त्याच्या माध्यमातून पाऊनेचार लाख रुपये पर्यंत वार्षिक उत्पन्न संस्थेस मिळत आहे. 

तसेच संस्थेचे वेअर हाऊस व पेट्रोल पंप यांची परवानगी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होईल असेही ते म्हणाले. यावेळी माजी आमदार मनीष जैन यांनी आपल्या मनोगतामध्ये गिरीश भाऊ हे आमचे मोठे बंधू असे  संबोधले आणि गिरीश महाजन यांच्या माध्यमातून जामनेर तालुक्याचा कायापालट झाला असेही ते म्हणाले. या शेतकरी सहकारी संघामध्ये चंद्रकांत बाविस्कर यांचे वडील काम करत होते आज त्यांचाच मुलगा या संस्थेचा सभापती म्हणून काम पाहत आहे 

ही गौरवाची बाब आहे असेही माजी आ.मनीष जैन म्हणाले ही संचालक बॉडी खूप चांगले काम करत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये परत यांनाच बसवा असेही गिरीष महाजन यांना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भरत पाटील व आभार डॉ. सुरेश पाटील यांनी मानले यावेळी संस्थेचे सभापती चंद्रकांत बाविस्कर माजी आ. मनीष जैन राजू बोहरा,उप.सभापती  बाबुराव गवळी, प.स.सभापती जलाल तडवी ,दगडू चौधरी, तुकाराम निकम, विलास बापू ,हेमंत पाटील, ठेकेदार प्रशांत महाजन व सर्व संचालक मंडळ व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध