Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ७ मार्च, २०२१

शेळगाव येथे कडब्याने भरलेल्या ट्रक मधील 1500 पेंड्या जळून खाक....


परंडा (राहूल शिंदे) दि.7 तालुक्यातील शेळगाव येथे खंडेश्वरवाडी येथील शेतकरी पोपट कडवकर यांच्या शेतातून 1500 कडब्याच्या पेंड्या घेऊन (MH 06 G-4928)हा ट्रक चापडगाव च्या दिशेनं जात होता.

दुपारी साधरण चारच्या दरम्यान शेळगाव येथील बस थांब्याच्या जवळ ट्रक उभा होता,विद्धूत तारांचे घर्षण होऊन त्याठिकाणी ठिणग्या पडल्या व कडब्याने पेट घेतला.दोरीने बांधलेला संपूर्ण कडबा कामगारांनी प्रसंगअवधान दाखवून,दोरी तोडून, ट्रक गावाच्या बाहेर एक किलोमीटर जळत्या आवस्थेत नेहण्यात आला व लतिफ शेख यांच्या शेतात ट्रक उभा करून त्याच्या शेतातील बोरवेलची विध्दुत मोटार चालु करुन पाण्याच्या साह्याने व कामगारांच्या धाडसेने ट्रक वीजवान्यांत यश आले.

 कुठल्याही प्रकारची जिवित हाणी झाली नाही. परंतु त्यातील संपूर्ण 1500 कडब्याच्या पेंड्यामात्र जळून खाक झाल्या आहेत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध