Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २७ मार्च, २०२१

पारंपरिक पद्धतीने होळीची तयारी..!




शेगांव: प्रतिनिधी (उमेश राजगुरे) 
पारंपरिक पद्धतीने होळीची तयारी पारंपरिक होळीचा सण साजरा करण्यासाठी ग्रामीण व शहरात ठिकठिकाणी जय्यत तयारी झाली आहे.

चाकोल्या, गोवऱ्या, टिमक्या तसेच पूजासाहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली होती. चिमुकल्यांसाठीच्या आकर्षक पिचकाऱ्या, नैसर्गिक आणि रासायनिक रंग, प्लॅस्टिकच्या पिशव्या, फुगे आणि पांढरे सदरे व कुर्ते अशा होळीसाठीच्या साहित्याने शेगांव बाजारात दुकाने मांडले आहे. या साहित्याची खरेदी करण्यासाठी चिमुकल्यांसह तरुणाईची खरेदी करत आहे.

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीचा उत्सव साजरा केला जातो. यानंतर पुढे पाच दिवस वेगवेगळे उत्सव साजरा होतात. दुसऱ्या दिवशी धुळवड असते. या उत्सवाचा महत्त्वाचा भाग म्हणजे होळी पेटवणे. होळी म्हणजे सर्वांना गारठून टाकणाऱ्या थंडीला निरोप. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे वसंत ॠतूचे स्वागत केले जाते.

होळीच्या दिवशी पौर्णिमेच्या सायंकाळी देवळासमोर किंवा आजकाल इमारतींमध्ये होळी पेटवली जाते. त्यामध्ये एरंड, माड पोफळी आणि उसाचा वापर केला जातो. त्याभोवती गोवऱ्या,चाकोल्या व लाकडे रचून ‘होलिकायै नम:’ हा मंत्र म्हणून होळी पेटवली जाते. होळीत भाजल्या गेलेल्या नारळाचा प्रसाद म्हणून वाटप केले जाते. 
जडवाद आणि भोगवाद यांना जाळून, त्यांची धुळवड करून आयुष्यातल्या आनंदाचा रंगोत्सव साजरा करायचा किंवा समाजातल्या अपप्रवृत्ती भस्मसात करून त्यांच्या नावानं ‘शिमगा’ करत सद्वृत्तींचा जयघोष करायचा, हा होळी सणामागचा हेतू आहे. 

वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळून होळी साजरी करतात. दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. 

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनदिनी एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. 

होळी, रंगपंचमीला नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई!

नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर पालिकेच्या फिरत्या पथकामार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि रंगपंचमी सार्वजनिक व खासगी ठिकाणी सार्वजनिकरित्या साजरी करण्यास मनाई केली आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन घालण्यात आलेले हे निर्बंध, तसेच कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर फिरत्या पथकामार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्तींवर पोलिसांमार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध