Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २७ मार्च, २०२१
बंजारा समाजाचा होळीकोत्सव/अशी रंगते बंजारा होळी!
दिपक पवार धुळे प्राचीन काळापासून दऱ्याखोऱ्यात वावरणाऱ्या बंजारा समाजाचा होळी उत्सव म्हणजे ग्राम रंगभूमीवरील टोटल थिएटरचा आविष्कार म्हणावा लागेल.हा होळीकोत्सव म्हणजे विधी नाट्य सोहळाच आसतो.ज्याप्रमाणे रामपूरच्या रामलीलमध्ये वेगवेगळी दृश्य वेगवेगळ्या ठिकाणी सादर होतात. त्याचप्रमाणे बंजारा समजतील होलिकोत्सवातील विधी व नृत्य गावातील वेगवेगळ्या ठिकाणी तीन दिवसापर्यंत संपन्न होत असतात .सर्व विधी एका सूत्रामध्ये बांधलेले असतात प्रत्येक समाजातील लोकसंस्कृती, सण आणि उत्सवामध्ये विशेषतः असतात.त्याप्रमाणे बंजारा लोकसंस्कृती मध्येही होळी उत्सवाचे विशेष महत्व दिसून येते.
प्राचीन काळापासून बंजारा समाजाचा होळीच्या उत्सवात ,बंजारा समाजाच्या प्रथा,रूढी,आणी, परंपरा सांस्कृतिचे दर्शन घडते., धुळे, जळगाव,या जिल्ह्यामध्ये बंजारा समाज विखुरलेला आहे.
खान्देशातील या दोन्ही जिल्ह्यातील बंजारा समजतील हॉलिकोत्सव आति शय आगळ्या -वेगळ्या स्वरूपात फाल्गुनात संपन्न होतो धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तांडा मध्ये होळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात सर्व ग्रामस्थ या उत्सवात सामील झालेले असतात होळी हा सण बंजारा समाजासाठी महत्त्वाचा सण आहे होळी मध्ये लेगी गीत गायला जातो गीतांमध्ये होळीचे वर्णन केलेले असतात याले गीतावर स्त्री-पुरुष गोलाकार वर्तुळात नसतात लहान मुलांपासून तर वृद्ध माणसाबरोबर या उत्सवात लेंगी गीत घातक नृत्य सादर करतात तीन दिवस हा उत्सव गावातील तांड्यावर चाललेला असतो प्रत्येक तांड्यावर होळीचे रंग उधळले जातात इतर समाजामध्ये होळी ही आपल्या दिवशी सायंकाळी पेटते परंतु बंजारा समाजामध्ये दुसऱ्या दिवशी सायंकाळी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी होळी पेटवली जाते गावकऱ्यांच्या सामूहिक उत्सवामुळे बंजारा समाजात एकात्मता निर्माण झाल्याचे दर्शन घडते.
समाजाची प्रगती साधण्यासाठी बंजारा समाजाचे लोककला रूढी आणि परंपरा प्रवाहित राहण्यासाठी होळी हा उत्सव बंजारा समाज जीवनाचे अंग ठरला आहे असेही म्हणता येईल परंपरेने चालत आलेली मौखिक गाणी,डफावर चाललेला लोकसमूहाचा नृत्यमय अविष्कार, पारंपारिक वेशभूषा, केशभूषा बंजारा समाजातील आगळे वेगळे आकर्षण ठरते बंजारा समाजातील लोकसंस्कृतीच्या प्रवाह अंतर्गत रीतीरिवाज, सण ,उत्सव ,व्रत,खेळ आणि मनोरंजन यांचा समावेश होतो बंजारा समाजाचे लोकगीत ,जन्म, विवाह ,आणि मृत्यू या संबंधी असतात व्रत व उत्सवातील लोकगीत हेच तिज उत्सव, जन्माष्टमी ,होळी, क्रिया गीत ,कृषी संबंधी गीत ,लोरी गीत ,पारिवारिक संबंधातील देवर -भाभी, सास- बहू उपदेश गीत आणि मुलांची खेळ गीते इत्यादी प्रकारच्या असतात दंडा जोडी नृत्य, टिपरी नृत्य, तीज नृत्य, इ.नृत्यप्रकार बंजारा समाज सादर करतात बाजाराच्या लोककथा व आध्यात्मिक कथांमध्ये सतिसवित्री ,नीती,धर्मरोफल, गुरुरी अज्ञ आशा असतात समाजाच्या आध्यात्मिक अंतर्गत संत सेवालाल महाराज यांचा जन्म मृत्यू व त्यांचे सामाजिक व अध्यात्मिक कार्य यांचा समावेश होतो
विशेष धुंड (वाढदिवस)
लोकासंस्कृतीचे दर्शन घडविणारा रंगोत्सव होळी आणि रंगपंचमी हा सण प्रत्येक समाजात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. बंजारा समाजानेही आपली होळीची आगळी-वेगळी परंपरा जपली आहे. बंजारा समाजाची होळी आणि त्यानंतर होणारा लेंगी महोत्सव ही एक सांकृतिक पर्वणीच असते. गेल्या कित्येक वर्षापासून या समाजाने होळीचे अस्सलपण, आणि परंपरा टिकवून ठेवली आहे.
समाजात होळी सणात धुंड आणि गेर ही एक वेगळी पद्धत आहे. याविषयी बंजारा लोकांची एक दंत कथा आहे. पूर्वी एक धुंडी नावाची राक्षसीण रात्री तांड्यात येऊन लहान बाळांना खात असे. कंटाळून लोकांनी त्या राक्षसिणीस धडा शिकविण्याचे ठरविले. एका पौर्णिमेच्या रात्री लाठ्या-काठ्या, गोफण घेऊन सर्व जण जमा होतात. नेहमीप्रमाणे राक्षसिण तांड्यात आली व बंजारा लोकांची टोळी पाहून न्यायकाच्या घरात घुसते. न्यायकाच्या घरातून तिला बाहेर काढून तिला ठार करतात आणि तिची होळी करतात.
बाळांच्या जीवनावरील धोका टळला आणि राक्षसिणीचा अंत झाला म्हणून बंजारा लोक होळी हा सण साजरा करतात अशी दंतकथा आहे.
वर्षभरात जन्मलेल्या मुलांचा ‘धुंड’ म्हणजेच वाढदिवस साजरा करतात. अशी ही बंजारा समाजाची आगळी-वेगळी होळी साजरी करण्याची परंपरा आहे. लोककलेचा सुंदर आविष्कार या निमित्ताने प्रत्येक तांड्यावर पहावयास मिळतो. डफडीचा आवाज घुमू लागला की त्याच्या तालावर तांड्यातील लहानांपासून तर थोरांपर्यंत सर्वच फेर धरून आनंदोत्सव साजरा करतांना दिसतात.
लेखन दिपक महादू पवार मार्गदर्शक श्री सोमा दिनकर पवार(तांडा कुंडाणे )धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा