Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १२ मार्च, २०२१
जिल्ह्यात शनिवार व रविवारला संचारबंदी..!
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता यापूर्वीच नगर परिषदांचे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधीत क्षेत्र वगळून सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत सुरू आहेत.
मात्र शनिवार व रविवारला होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी संचारबंदीचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात दुध विक्रेते, दुध वितरण केंद्र सकाळी 6 ते दुपारी 3 व सायं 6 ते रात्री 9 वाजे पर्यंत नियमितपणे सुरू असतील.
या औषधी सेवा, दवाखाने, रूग्णवाहिका सेवा, एस टी वाहतूक 50 टक्के प्रवासी क्षमतेसह, माल वाहतूक, पेट्रोल पंप 24 तास सुरू असतील. टायर पंक्चरची दुकाने नियमित सुरू असतील. पुर्वनियोजीत परीक्षा वेळापत्रकानुसार होतील. बँकाचे कामकाज त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहील. या व्यतिरिक्त अन्य सर्व दुकाने, आस्थापना, प्रतिष्ठाने बंद राहतील. सदर आदेश जिल्ह्यात 12 मार्च रोजी सायंकाळी 6 पासून ते 15 मार्च 2021 चे सकाळी 8 वाजेपर्यंत लागू राहील.
या कालावधीत संचारबंदी लागू असल्याने नागरिकांना विनाकारण बाहेर फिरण्यास मनाई राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरीकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. कोरोना संसर्ग नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा