Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ३१ मार्च, २०२१

जिल्हा माहिती कार्यालय उस्मानाबाद व जागृती फाऊंडेशन चिंचपूर(बु) यांच्या वतीने तालुक्यात जनजागृती....


परंडा (राहूल शिंदे) दि.31 राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अनुसुचित जाती उपयोजनेअंतर्गतच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविन्यासाठी परंडा तालुक्यामधे जिल्हा माहीती कार्यालय व जागृती फाऊंडेशन यांच्या वतीने कलापथक व पथनाट्याच्या माध्यमातुन जनजागृती करन्यात आली.

 यामधे परंडा तालुक्यातील,परंडा शहर, आरणगाव ,डोमगाव ,खासपुरी,व कुंभेफळ येथील दलित वस्त्यामधे जागृती फाऊंडेशन संस्थेच्या कलापथकाचा कार्यक्रम घेण्यात आला.त्यामधे त्यांनी अनुसुचित जाती / नवबौध्दांसाठीच्या योजना शैक्षणिक सवलती , वस्तीगृह , घरकुल , शिष्यवृत्ती , औद्योगिक प्रशिक्षण , आश्रमशाळा , राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती , परदेशात शिक्षणाची संधी , आशा विविध योजनांची माहीती कलेच्या माध्यमातुन देण्यात  आली , मनोरंजनातुन जनजागृती व समाज प्रबोधनाचे उत्तम कार्य कालापथकाने केले आहे.

 शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले , यामधे संस्थेचे सचिव शाहीर सिध्दार्थ सावंत , उपाध्यक्ष सुनिल बनसोडे ,सदस्य भीमाई बनसोडे , उषा सावंत , विश्वास सावंत , आनंद सावंत , राम लोहार , लक्ष्मण लोहार, बुवासाहेब साठे , बिरूदेव सावंत हे कलावंत सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध