Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३० मार्च, २०२१
Home
/
Unlabelled
/
ज्येष्ठ पत्रकार व सेवानिवृत्त प्राचार्य प्रा.प्रदिप वासुदेव दिक्षीत यांच्यावर आज रथ गल्ली येथे प्राणघातक हल्ला
ज्येष्ठ पत्रकार व सेवानिवृत्त प्राचार्य प्रा.प्रदिप वासुदेव दिक्षीत यांच्यावर आज रथ गल्ली येथे प्राणघातक हल्ला
शिंदखेडा/प्रतिनिधी:येथील दै.देशदुतचे ज्येष्ठ पत्रकार व सेवानिवृत्त प्राचार्य प्रा.प्रदिप वासुदेव दिक्षीत यांच्यावर आज रथ गल्ली चौकात प्रख्खात गुंड पवन कोमल सिंह राजपूत यांने प्राणघातक हल्ला चढविला.प्रा.दिक्षीत यांस पत्रकार विनायक पवार यांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.पवन राजपूत हा त्यांच्या रथगल्ली येथील जुन्या राहत्या घरी दगडफेक करीत होता.
ही बातमी समजताच पत्रकार दिक्षीत यांनी धाव घेतली असता राजपूत याने त्यांना शिवीगाळ केली,दगड मारुन फेकला तर खाली पडले, चष्मा देखील फोडून टाकला डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यानंतर पवन राजपूत यांच्या वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.सदर फिर्यीद प्रा.प्रदिप दिक्षीत यांनी दिली आहे.
त्याच्यावर गु.र.क्र.50/2021 अन्वये 307,323,504,506,427 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.सदर आरोपीला पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गजानन गोटे यांनी पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने त्वरीत ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत आहेत.
पवन राजपूत याने शिंदखेडा शहरासह परिसरात अनेक मारहाण,चोरी करणे, स्त्रीयांचे मंगलपोत हिसकावून नेणे, घरफोडी करणे आदी साठी माहिर असल्याचे बोलले जाते.त्याच्यावर अनेक प्रकारच्या गुन्हयाची नोंद पोलीस स्टेशन आहे.म्हणुन सदर आरोपीवर जास्तीत जास्त गून्हयाची नोंद करुन कारवाई केली जावी अशी मागणी पत्रकार प्रा.प्रदिप दिक्षीत यांनी केली आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन गोटे यांच्या कडे सोपविण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा