Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २६ मार्च, २०२१

भोईराज पतसंस्थेला मॅनेजर सुनील वाडीले व संचालक विजय महाले यांनी संगनमताने भ्रष्टाचार झाल्याबाबत संस्थेचे लेखापरीक्षकांसमोर दोघांचाही लेखी जबाब व खुलासा सादर


                                                          शिंदखेडा :(प्रतिनिधी) येथील भोईराज पतसंस्थेतील एक ना अनेक भ्रष्ट प्रकरण लेखापरिक्षणातून बाहेर आलेली आहेत. पतसंस्थेचे मॅनेजर सुनील वाडीले आणि भोईराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संचालक विजय महाले यांनी संगनमताने संस्थेतील सारा गैरव्यवहार केल्याचे प्रत्यक्ष लेखी जबाब लेखापरीक्षक समोर लिहन दिल्याने खळबळ उडाली असून सभासदा मध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

सन २०१३ पासून ते सन २०१९ पर्यंत हा गैरव्यवहार या संस्थेच्या महाठगांनी केल्याचे निदर्शनास आलेले आहे. मात्र आता शासन सहकार विभागामार्फत यांच्यावर कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे दरम्यान जावक क्रमांक नसलेले व दिनांक नसलेले लेखी पत्र जसेच्या तसे वाचकांसमोर मांडत आहोत यामध्ये मॅनेजर सुनील पुना वाडीले यांनी संस्थेच्या लेखापरीक्षक यांना दिलेल्या लेखी जबाबात म्हटले आहे की ३१ ऑगस्ट २०१९ रोजी शासनातर्फे दिलेले नोटीस पत्र मिळाले या विषयास अनुसरून चार नोटिसा संदर्भ विषयात परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता देण्यात आल्यात. यास संचालक विजयसिंग जामसिंग महाले यांच्याकडून लेखी उत्तरात त्यांनी झालेल्या कर्ज व्यवहारातील पूर्ण रक्कम भरण्याचा कबुलीजबाब दिला आहे. 

तसेच या व्यवहाराबाबत पतसंस्थेतील कोणतेही संचालक किंवा कर्मचारी यांना जबाबदार धरू नये असे त्यांनी लिहून देण्यात आले असून लवकरात लवकर विजयसिंग महाले यांच्याकडून सर्व कर्ज वसुली करुन भरण्यास बांधील आहे असे लेखी जबाब करून दिला आहे. म्हणजेच या महाठगांनी गैरव्यवहार केल्याचे सिद्ध होते. तसेच दुसरे पत्र जावक क्रमांक नसलेले व दिनांक नसलेले विजयसिंह महाले यांनी दिले असून या त्यांच्या लेखी जबाबानुसार मॅनेजर सुनील पुना वाडीले यांनी माझ्या सांगण्यावरून हा व्यवहार केला आहे. 

तसेच यासर्व गैरव्यवहार संबंधी जाब आम्हा दोघांना विचारण्यात यावा. आसा लेखी जबाब त्यांनी संस्थेच्या लेखापरीक्षकांना करून दिला आहे. यामुळे दोघांनी संगनमताने पतसंस्थेची मनसोक्त लुट करणाऱ्या लुटारुवर अजूनही गुन्हा का दाखल होत नाही. याबाबत ठेवीदार जाब विचारणा करीत आहे. 

तसेच शासनाच्या सहकार खात्याचे अधिकारी व संस्था नोंदणी अधिकारी व संस्था लेखापरीक्षक हे नेमके गुन्हा दाखल करण्यासाठी का उशिर व टाळाटाळ करीत आहे. हे गुढ रहस्य न उलगडणारे कोडे लवकरच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. (सविस्तर वाचा पुढील अंकात)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध