Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २७ मार्च, २०२१

धनुरला" हर घर जल से नल " योजणे ची पाईपलाईन टाकत शुभारंभ ..।



धनुर प्रतिनीधी: धुळे तालुक्यातील धनुर गावात खासदार तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या पाठपुराव्यातून  केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाने मंजूरी दिलेली" हर घर नल से जल " योजणेचा धनुर गावात पाईपलाईन टाकत शुभारंभ झाला आहे.या योजणेचा प्रमुख्य उद्देश गावातील प्रत्येक कुटुंबाला  पिण्याचे पाण्यासाठी नळ कनेक्शन उपलब्ध करून देत पाण्याच्या बाबतीत त्यांना स्वावलंबी बनविणे आहे.
       
धुळे तालुक्यातील एकूण ८९
(एकोणनव्वद) गावांचा समावेश असलेल्या  " हर घर नल से जल " या योजणेची धनुर/लोणकुटे ग्रामपंचायत मार्फत पाईपलाईन टाकत कार्याची सुरुवात करण्यात आली आहे. कडक उन्हाळ्याच्या दिवसांत ग्रामस्थांतर्फे मोठ्या प्रमाणावर मागणी लक्षात घेता त्याची तात्काळ अंमलबजावणी होत आहे. असे धनुर/लोणकुटे येथील युवा गटनेते सुनिलभाई शिंदे यांनी याप्रसंगी भावणा व्यक्त केल्यात.सदर योजणा हि पुर्णपणे मोफत असुन धनुर/लोणकुटे ग्रामस्थांच्या नळकनेक्शनची मागणी नुसार संपूर्ण गावभर नळ जोडणी ग्रामपंचायत तर्फे दिली जाणार आहे.
       
याप्रसंगी उपस्थितांपैकी धनुरचे प्रथम लोकनियुक्त सरपंच माईसाहेब सौ.सत्यभामाबाई रोहिदास शिंदे,उपसरपंच युवराज चौधरी सर,ग्रा. पं.सदस्यांपैकी कमलताई पटेल,लताबाई चौधरी,मालुबाई शिंदे,माधुरी शिंदे तर ग्रामरोजगार सेवक राजेंद्र वाघ सर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध