Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २४ एप्रिल, २०२१
पत्रकारांसाठी लस, ऑक्सिजन बेड आरक्षित करावेत...! ईश्वर बोरसे
धुळे जिल्ह्यातील पत्रकारांना प्राधान्यक्रमाने लस उपलब्ध करून द्यावी. तसेच ज्या पत्रकारांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यासाठी रेमेडीसिविर औषधा सोबतच ऑक्सिजन बेडही आरक्षित करण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघाचे धुळे जिल्हा अध्यक्ष ईश्वर बोरसे यांनी एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.
पत्रकार हे फ्रन्टलाईन वॉरियर असल्याने पत्रकारांना विशेष आरक्षण देण्यात यावे. समाजातील सत्य परिस्थिती जनसामान्या समोर आणण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून पत्रकार सध्या काम करीत आहेत. काही पत्रकार पंचेचाळीस वर्षापेक्षा कमी वयाचे असल्याने त्यांना अद्याप लस देण्यात आलेली नाही, त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून लस उपलब्ध करून देऊन त्यांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच दुर्दैवाने काही पत्रकारांना कोरोनाची लागण झाली असताना रेडीमीसीवीर औषधांसोबत बेडची ही उपलब्धता करू न द्यावी अशी मागणी सदरील निवेदनात करण्यात आलेली आहे.
संचार बंदीच्या काळात केवळ अधीस्वीकृतीधारक पत्रकारांनाच वृत्त संकलनासाठी फिरता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. वास्तविक पाहता पत्रकारिता करणाऱ्या ८५ टक्के लोकांकडे अधस्विीकृती कार्ड नाही. त्यामुळे या पत्रकारांना संचार बंदीच्या काळात त्रास होऊ नये. ते ज्या वृत्तपत्रामध्ये काम करतात त्या वृत्तपत्राच्या ओळखपत्राचा आधार घेऊन त्यांना वृत्त संकलनासाठी फिरण्याची मुभा देण्यात यावी. अशीही मागणी पत्रकार संघाच्यावतीने महाराष्ट्र शासनाला करण्यात आलेली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा