Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २२ एप्रिल, २०२१
शिरपुरात श्रीराम मंदिरात जन्मोत्सव साजरा
शिरपूर(प्रतिनिधी)येथील प्राचीन काळापासून असलेले चैत्र शुक्ल पक्षे ९ वार बुधवार दि.२१ एप्रिल २०२१ श्रीराम मंदिर देवस्थान ( श्री भोंगे ) शिरपूर येथे समस्त भाविकांचे उपस्थितीत श्रीराम नवमी निमित्त दुपारी ठिक १२ वा. श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
सदर प्रसंगी आमचे स्नेही महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे प्रदेश कार्याध्यक्ष दादासाहेब शामकांत जगन्नाथ ईशी व शिरपुर - वरवाडे नगर परिषद - बांधकाम सभापती ताईसो. छाया शामकांत ईशी यांचेहस्ते महाआरती करण्यात आली.
कोरोना ह्या महामारी रोगापासुन संपुर्ण जगाचे रक्षण करावे व संपुर्ण जगात आमचे भारत मातेचा जयजयकार होऊ द्यावा असा संकल्प श्रीरामरायाचरणी करण्यात आला.
श्रीराम मंदिर देवस्थानचे मठाधिपती महंत सतीशदास महाराज भोंगे व भागवताचार्य,गौ - सेवक,वेदपारंगत प्रमोद रघुनाथ भोंगे यांचे हस्ते आशिर्वाद देण्यात आला. ह्यावेळी श्री चेतन नारायण चौधरी,श्री गोविंद दौलत मोरे,श्री भानुदास दौलत मोरे,श्री अशोक मोतीराम सोनार, सुनील अग्रवाल, सौ प्रतिभा चौधरी,भजनी मंडळ चे कार्यकर्ते, रामभक्त असे अनेक भक्तगण हजर होते. यावेळी प्रसादाचेही वाटप करण्यात आले.
यावेळी सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून श्रीराम नवमी साजरी करण्यात आली. सर्व भक्तांनी मास लावला होता.मठाधिपती ह भ प श्री सतिषदास महाराज यांच्या हस्ते श्री शामकांत ईशी व सौ छायाताई शामकांत ईशी यांचा सत्कार करण्यात आला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा