Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

राम तुझ्यात राम,माझ्यात राम


   
"राम" किती ताकद आहे ह्या दोन शब्दांमध्ये फक्त जय श्री राम म्हटल तरी वाटत की आपल सुख आणि दुःख वाटणारा आहे कुणीतरी माझ्यातला म्हणजे माझ्यातलाच राम.एकदा आपल्याला विश्वास असला ना की आपल्यात राम आहे तर सगळी सुख दुःख हसत हसत पर पडतात.आता सुख आणि दुःख का? कारण बहुतेकदा सुखात आपण राम विसरतो पण दुःखात न विसरता आपल्याला आठवण येते.भगवंताने जर आपल्यावर लक्ष ठेवायचं अस ठरवलचं आहे , तर तो दोन्ही प्रसंगी आपल्या सोबतच असणार ना आठवण पडते ती आपल्याला. राम-मर्यादापुरुषोत्तम राम, मर्यादापुरषोत्तम म्हणजे सर्व मर्यादा पाळून देखील अतिशय उत्तम आणि आदर्श जीवन रामाच होत.
      
सूर्याचा उदय होत असतो तेव्हा सूर्य लाल दिसतो आणि अस्त होतांना देखील लालच दिसतो त्याचप्रमाणे महापुरुष देखील संपत्ती आणि विपत्ती मध्ये पण समान असतात.संपत्ती आली म्हणून खुश होत नाही आणि विपत्ती आली म्हणून दुःखी पण होत नाही.असच रामाचं, रात्री सांगितलं जातं की उद्या राज्यभिषेक होणार आणि दुसऱ्या दिवशी वनवास पण दोन्ही प्रसंगी राम शांत कुठलीही चेहऱ्यावरची रेषा हलली नाही.
       
श्रीविष्णूंचा सातवा अवतार श्रीरामांचा आहे.आता काही लोक म्हणतात 'रामायण' असं काही घडलच नाही.पण काही इतिहासकारांनी शोध लावला आणि संबंधित गोष्टी शोधून काढल्या,असो तो माझा विषय नाही पण मला वाटत राम असल्याशिवाय का एवढे उत्तम चरित्र कुणाचं असू शकत,नाही शक्यच नाही.'रामायण' म्हणजे आयुष्य कसं जगावं हे सांगणार महाकाव्य आहे.राम समजून घ्यायला माझ्या आयुष्याचा शेवटाचा क्षण आला तरी थोड्याफार प्रमाणातच माझ्या हाती काहीतरी लागेल.एवढं सोपं नाही रामाला समजणं पण समजून घ्यायचं असल तर प्रत्येकाने प्रयत्न करायलाच हवा.कारण खूप काही आपल्याला कळत नसलं तरी प्रयत्न केला तर आयुष्याचा मार्ग मात्र नक्कीच सुखकर होईल.
      
श्रीविष्णूंचा अवतार असला देखील प्रभू रामाचं आयुष्य अतिशय सामान्य माणसासारखं होत.

संसार,त्याग,कष्ट,यातना,सुख ह्यासगळ्या गोष्टी सांभाळताना रामालापण सामान्य माणसासारखा त्रास सहन करावा लागला.पण प्रभू रामाने कोणालाही दोष न देता हसत-हसत सगळ्या गोष्टी केल्या.मर्यादा,प्रेम,आपुलकी,संस्कार,त्याग,प्रचंड इच्छाशक्ती,धेर्य पराक्रम यांचा संगम म्हणजे 'राम' आणि प्रभू रामाचं 'रामायण'.मानवी जीवनातील सर्व भोग श्रीरामांना भोगावे लागले. 
     
आजची परिस्थिती अशी आहे की रावण आपल्या सगळ्यांमध्ये आहे.पण हरवला आहे तो 'राम' , कारण राग, मत्सर, लोभ, अविचार हे सगळ आहे आपल्यातल्या रावणात,परंतु संयम,मर्यादा,समर्पण, समजूतदारपणा ह्यांची कमतरता असल्यामुळे आपल्यातला राम मात्र आपल्यालाच उमगत नाहीय.चांगल्या वाईटाच जर मोजमाप करायचं ठरवलं तर वाईटच जास्त वजनदार असणार आणि तरी देखील राम आपल्याला लाडका व आपला वाटतो आणि रावणाबद्दल द्वेष वाटतो. रावण बाहेर निघाल्याशिवाय राम आपल्यातच बसलाय हे कळणार नाही.अंधश्रद्धा नाही तर श्रद्धा आहे माझी रामावर,विश्वास आहे मला काहीही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत राम मात्र माझ्यासोबतच आहे.आता ह्या रामाला एकच सांगते देवा तुझ्या ह्या भक्तांना सांभाळ.कारण भरकटलोय आम्ही तूच त्यातून सुखरूप काढ.
     
"देवळातल्या दगडात आम्ही शोधतोय धाम आम्ही आमच्यातला राम कधी पहिलाच नाही....."

लेखन
सौ.सोनाली शरद पाटील...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध