Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २९ एप्रिल, २०२१
लसीकरण:नोंदणी सुरु झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच CoWIN चा सर्व्हर क्रॅश
मुंबई(प्रतिनिधी) 18 वर्षांवरील व्यक्तींची नाव नोंदणी 28 एप्रिल रोजी दुपारी चार वाजल्यापासून सुरु झाली केंद्र सरकारने एक मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु करणार असून या टप्प्यात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लस दिली जाणार आहे. यासंदर्भातील नोंदणी प्रक्रिया आज दुपारी चार वाजल्यापासून कोविन अॅपवर सुरु झाली.मात्र ही नोंदणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोविन अॅपचा सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर येत आहे.
सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी यासंदर्भातील तक्रार नोंदवली असून स्क्रीनशॉर्ट पोस्ट केले आहेत.इकनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चारच्या सुमारास 17 कोटी 88 लाख भारतीय आरोग्य सेतू अॅपचा वापर करत होते.
आरोग्य सेतू तसेच कोविन अॅपवरुन नोंदणी केली तरी मूळ नोंदणीसाठी कोविनच्या अॅपवरच नोंदणी करणाऱ्यांना रिडायरेक्ट केलं जात असल्याने कोट्यावधी युझर्स एका वेळी नोंदणीसाठी आल्याने सर्व्हर क्रॅश झाल्याचे समजते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा