Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १२ एप्रिल, २०२१

विकएंड लॉकडाऊनला संगमनेर तालुक्यात चांगला प्रतिसाद....

संगमनेर(अंबादास सांगळे) दि.12 तालुक्यात राज्यसरकारच्या विकएंड लॉकडाउनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिला आहे. पोलिसांनी नाकेबंदी करत वाहनासह नागरिकांची कसून चौकशी केली.दोन दिवस सकाळपासूनच शहरात शुकशुकाट होता. दुपारी उन्हाचा तडाखा असल्याने भयाण शांतता पसरली होती. शनिवार व रविवार मेडिकल व वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. दोन दिवसांच्या लॉकडाऊनमुळे लोकांनी शुक्रवारीच भाजीपाला व किराणा खरेदी केला होता.

संगमनेर शहरात कायमच वर्दळ असलेला परिसर नवीन नगर रोड, तीन बत्ती चौक, नेहरू चौक, अकोले नाका आदी ठिकाणी शुकशुकाट होता. पोलीस सकाळीच रस्त्यावर उतरले होते. रस्त्यावरील नागरिकांची कसून चौकशी केली जात होती.

अकोले शहरात लॉकडाऊनला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. महात्मा फुले चौकात पोलीस यंत्रणा ही विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना अडवून विचारणा करत होती. बसस्थानकावर पूर्णपणे शुकशुकाट होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध