Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १२ एप्रिल, २०२१
पिंप्री लौकी अजमपूर शिवारात उभा ट्रासफार्म जळून खाक..
संगमनेर (अंबादास सांगळे) दि.12 तालुक्यातील पिप्रीं लौकी अजमपूर शिवारात रविवारी सायंकाळी उभा ट्रासफार्म जळून खाक
झाला असून यावेळी लगत असलेला पोल्ट्री फार्म थोडक्यात बचावला आहे.
याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळी 5 वाजेच्या
सुमारास शरद आप्पाजी दराडी यांच्या शेतातील ऊभ्या ट्रासफार्मने अचानक पेट घेतला व काही वेळात हा ट्रासफार्म जळून खाक झाला.
यावेळी अवघ्या दोनशे फुटाच्या अतंरावरील डॉ. पप्पू दराडी यांचा 10 हजार पक्षी असलेला पोल्ट्री फार्म थोडक्यात बचावला आहे.
या ट्रासफार्मरवर 20 ते 21 कनेक्शन असून ट्रासफार्म जळाल्याने त्याचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे.ओवरलोडिंगमुळे ट्रासफार्मर जळाल्याचा अदांज वर्तवला जात असला तरी यावेळी कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही.
तर ट्रासफार्मर जळाल्याने महावितरणचे अदांजे 3
लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा