Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ४ मे, २०२१
Home
/
Unlabelled
/
अरे बापरे ऐ काय संचारबंदीच्या काळात दुकानात निघाले तब्बल २५० ग्राहक ; पालिकेकडून दुकान सील
अरे बापरे ऐ काय संचारबंदीच्या काळात दुकानात निघाले तब्बल २५० ग्राहक ; पालिकेकडून दुकान सील
रावेर,(प्रतिनिधी ) रावेर येथील स्टेशन रोडवर भुसावळ येथील व्यापाऱ्यांच्या एका कापड मॉलमध्ये संचारबंदीच्या काळात प्रंचड गर्दी झाल्याची गो पनिय बातमी पालिकेच्या पथकाला मिळाली असता, दुकान मालकाने पथकास दंडाबाबत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने, पथकातील अधिकारी दुकानात शिरले असता, त्यांना प्रंचड गर्दी आढळून आल्यावर याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देण्यात आली असता पालिका, महसूल व पोलीस रावेर तहसिल प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले,यानंतर आता बसलेल्या तब्बल २५० जणांना बाहेर काढण्यात आले.
शॉपिंग मॉलमध्ये जाण्यासाठी चोरटा मार्ग तयार करण्यात आला असल्याने,अधिकार्यांनी या प्रकरणी चौकशीसाठी दुकातानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.दुकानात मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी कोरोनाला आयते आमंत्रण देण्यासारखे असून,सदरील ठिकाण सुपर स्प्रेडर ठरत असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी ‘नजरकैद’ शी बोलताना दिली आहे.
सकाळी ११ वाजेपासून संचारबंदी सुरु झाल्यावर,यादुकानात गर्दी असल्याची माहिती पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्यावर पथकाच्या तपासणीत तब्बल २५० ग्राहक मिळून आल्याने,एकच खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती पथकाने मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना दिल्यावर ते तातडीने या ठिकाणी हजर झाले.
त्यांच्या नंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तहसीलदार उषाराणी देवगुणे,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे देखील या ठिकाणी हजर झाले.दुकानातील सर्व महिला व पुरुष अशा २५० ग्राहकांना बाहेर काढण्यात आले.या नंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन,दुकान सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.याबाबत कायदेशीर दंडात्मक कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दिली.
कारवाई वेळी अधिकारी दुकानात पोहचल्यावर दुकान मालकाने मै लोगोके लिये दुकान चालू किया था अशी गर्विष्ठ भाषा वापरून अधिकाऱ्याचा अपमान केला, यावेळी पोलीस कर्मचारी भागवत धांडे यांनी मालकाचा यावर खरपूस समाचार घेतला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा