Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ६ मे, २०२१
Home
/
Unlabelled
/
तरुण गर्जनाच्या प्रयत्नास यश..! अखेर भोईराज पतसंस्थेच्या अपहार कर्त्यांवर गुन्हा दाखल..!
तरुण गर्जनाच्या प्रयत्नास यश..! अखेर भोईराज पतसंस्थेच्या अपहार कर्त्यांवर गुन्हा दाखल..!
शिंदखेडा प्रतिनिधी:तरुण गर्जना वृत्तपञाने भोईराज पतस्थेतील अपहरबाबत व अपहरकर्त्यांवर गुन्हा दाखल होणेबाबत मागील अंकांमधून भंडाफोड केल्यानंतर व त्यावर वेळोवेळी तगादा लावून धरल्याने अखेर शिंदखेडा शहरातील भोईराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या संस्थेच्या मॅनेजर सुनिल वडिलेसह संस्था संचालक अश्या १८ व्यक्तीवर अखेर शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी चौकशी सुरू केली असून सभासदांकडून होत असलेल्या मागणीला अखेर तरुण गर्जना वृत्तपत्राने लावून धरलेल्या तगडामुळे यश मिळवून देता आले आहे.
शिंदखेडा शहरातील भोईराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेच्या १८ संचालक मंडळ व व्यवस्थापन यांनी संगनमत करून सुमारे ९ सभासदांच्या नावाने ६३ लाख रुपये खोटे बनावट कर्ज टाकून तसेच ९ सभासदांची ६०७९५८ इतकी मुदत ठेव रक्कमेची रोख शिल्लक बनावट पद्धतीने घटवून एकूण ६९९७९५८ रुपये इतक्या रक्कमेचा अफरातफर केल्याच्या आरोपावरून या सर्व मंडळी विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या आदेशान्वये अखेर शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शिंदखेडा शहरातील सहकार क्षेत्रात दाखल होणाऱ्या या गुन्ह्यात पहिलीच वेळ असून याबाबत खळबळ उडाली आहे दरम्यान मॅनेजर सुनील वाडीले त्याचा साथीदार संचालक विजय महाले हा फरार असून याबाबत देखील चौकशी सुरू झाली आहे.
दरम्यान तरुण गर्जना वृत्तपञाने सभासदांच्या न्यायहक्कासाठी विडा उचलला असून अखेरपर्यंत न्याय मिळवून देण्यासाठी व सभासदांच्या ठेवींचा पैसा परत मिळण्यासाठी हा लढा सुरु असणार असल्याचे देखील आश्वासित करण्यात येत आहे.
धुळे येथील प्रमाणित लेखापरीक्षक रामसिंह जाधव यांनी शिंदखेडा भोईराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत झालेल्या अफरातफर संदर्भात मॅनेजर सुनील वाडीले संचालक विजय महाले व इतर संचालकांविरोधात शिंदखेडा पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार गेल्या जानेवारी महिन्यापासून सुरू असलेली चौकशी व या चौकशीच्या आधारे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी न्याय दिला असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिंदखेडा पोलिसांना प्राप्त होऊन याबाबत संचालकांसह मॅनेजर सुनिल वडिले वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी व्यवस्थापक सुनील वाडीले संचालक विजय महाले यांच्यासह संस्थेतील व्यवस्थापकाचे भाऊ नवनीत वाडीले नामदेव तमखाने भाऊराव मोरे हरी मोरे चांगो तमखाने चुनीलाल वाडीले शिवदास मोरे बापूराव नाईवाडे लोटन चौधरी नानाभाऊ व फुले चंद्रकांत चौधरी उषाबाई मोरे मिनाबाई वाडीले नारायण मोरे विनोद तमखाने सुनील बडगुजर निर्मलाबाई मोरे सर्व राहणार शिंदखेडा या सर्वांनी संगणमत करून दिनांक १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ यादरम्यान वारंवार संगणमत करून नऊ सभासदांचे नावाने ६३ लाख रुपयांचे खोटे बनावट कर्ज टाकून तसेच ९ सभासदांची मुदत ठेव घटवून सुमारे ६०७९५८ अशी एकूण पतसंस्थेची ६९०७९५८ रुपयांचा अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल झाला असून याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या तसेच शिनखेडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन गोटे अधिक तपास करीत आहेत दरम्यान तरुण गर्जना वृत्तपञानी या भ्रष्ट कारभाराविरोधात आवाज उठवून धरल्याने सभासदांच्या मागणीला यश मिळाले आहे.
तसेच या पुढील कालावधीतही काही रक्कमेचा अपहार झालेला असू शकतो. कारण सन २०२०-२०२१ चे ऑडिट सुरु करण्याची वेळ आलेली असताना, अजून सन २०१९-२०२० या कालावधीचा तपासणी अहवाल अजून येणे बाकी आहे. याबाबत तरुण गर्जना सविस्तर मागोवा घेत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा