Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ६ मे, २०२१
विश्वजन आरोग्य सेवा समितीचे, पिंपरीराजा येथे महारक्तदान शिबिर संपन्न...
औरंगाबाद(राहूल शिंदे)दि.6 (संभाजीनगर)येथील पिंपरीराजा गाव येथे विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य आणि धीरज नाईक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने विठ्ठल रखुमाई मंदिर,येथे राज्यातील रक्ताचा तुटवाडा व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या रक्तदान करण्याच्या आव्हानाला साथ देत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कोरोच्या पार्श्वभूमीवर सोशल डिश्टनसिंग, मास्क , सीनेटाझर, आदी सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते.
विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा सौ.छायाताई भगत आणि प्रदेश संपर्कप्रमुख रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर आयोजित केले होते.
कोरोनाच्या या कठीण काळात समितीच्या युवा पदाधिकारी संभाजीनगर युवती जिल्हासमन्वयक कु. राधा लाटे पाटील आणि संभाजीनगर तालुका युवक संपर्कप्रमुख प्रतिक गावंडे यांनी आपला वेळ वाया न घालवता सामाजिक व आरोग्य सेवा करत 30 रक्तदात्यांचे शिबीर घेतले.
रक्तदान करणाऱ्या सर्व 30 रक्तदात्यांचे, ग्रामस्थ मंडळ पिंप्रीराजा यांचे आभार व्यक्त केले. रक्त संकलन करण्यासाठी लोकमान्य ब्लड बँक औरंगाबाद यांनी सहकार्य केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा