Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३१ मे, २०२१

अमळनेर शहरात बैलगाडीतुन रेती जाते तरी कुठे ?



पंकज पाटील,तरुण गर्जना :रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ,डंपर ,ट्रकला , रेती भरणाऱ्या जेसीबी ,पोकलेन मालकाला दंड ,वाहन जप्ती,गुन्हे अमळनेर तहसिलदार यांनी दाखल केले आहेत.शहरी भागात मात्र रेती वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला सुट का ? ही बैलगाडी अमळनेर शहरात कुण्या शेतकऱ्याच्या घरकुल बांधकामावर रेती टाकत असेल का ?  म्हणून अमळनेर महसूल प्रशासन दुर्लक्ष  तर करत नसेल ना ? असे एक ना अनेक प्रश्न अमळनेर शहरात रेती वाहतूक करणाऱ्या या बैलगाडीबद्दल लोकांच्या मनात निर्माण होत असतील .पण त्याच्या मुळा पर्यत ,ना जनता गेली,ना महसूल प्रशासन .

अमळनेर शहरात रेतीचे घाट बंद असोत किंवा बोरी नदीला पाणी  असो,पण अमळनेर शहरातील एका नामांकित  ठेकेदाराच्या कामावर आजपर्यंत कधीही रेतीचा तुटवळा भासला नाही.त्यांच्या अपार्टमेंटच्या कामांवर ,शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकामावर ,पेट्रोल पंप बांधकामावर व शहरात सुरू असलेल्या इतर कामांवर आज पर्यंत कधीही रेतीचा कमतरता दिसून आलेली नाही .त्यामुळे तालुक्यातील नंबर एकच्या ठेकेदारात त्यांची गणना होते. 

अमळनेर  महसूल प्रशासनाच्या डोळ्या देखत हा सर्व खेळ सुरू असताना महसूल प्रशासन गप्प का ? तर त्याच्या मागचे सरळ उत्तर बैलगाडीने रेती वाहतूक होत असल्याने.मुळात महसूल प्रशासनानाने ती बैलगाडी कुणाच्या कामावर,साईट्स वर रेती टाकते ? दिवसभरातून किती बैलगाडी रेती वाहतूक होते ? रेती वाहतूक करणाऱ्या अश्या व यासमान  किती बैलगाडया शहरात रेती वाहतूक करत आहेत ? त्या एकाच मालकाच्या आहेत का ? दिवसभरात त्या किती ब्रास रेती वाहतूक करतात ? रेती टाकल्यानंतर त्या कुणाच्या दाराशी लावल्या जातात ? असे एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी महसूल प्रशासनातील कर्मचारी,अधिकारी यांची डोकी चालत नसतील का ? सोयीस्कर या विषयाकडे त्यांनी दुर्लक्ष तर केले नसेल ? असे एक ना अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत.

ठेकेदाराने आजपर्यंत रेती रॉयल्टीत  करोडोचा महसूल बुडवत अब्जो रुपयांची माया जमवली.याचा हिशोब महसूल प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.
बैलगाडीने आपल्या साईटसवर रेती वाहतूक करून मुंगी होवून साखर खावी, त्याप्रमाणे बैलगाडीतुन रेती वाहतूक करावी असा हा खेळ  दिवसा ढवळ्या सुरू आहे . महसूल प्रसासनाच्या डोळ्यात धूळ घालावी व रेती चोरी करून शासनाची दिशाभूल करत  महसूल बुडवून आपली ठेकेदारी राजरोसपणे सुरू ठेवावी असा हा प्रकार प्रशासनाच्या नजरे समोर घडत आहे.

ग्रामीण भागात मात्र रेती लिलाव व घाट बंद असल्याने हजारो गरीब कुटुंबांची ,घरकुल लाभार्थींची घरे रेती अभावी आजही बंद आहेत . सरकारी कामांवर ,ठेकेदारांच्या कामांवर महसूल प्रशासनाच्या नजरे समोर अमळनेर शहरात रेतीचे ठिय्ये असताना, ना त्यांचा पंचनामा ,ना दंडाची कारवाई.
शासनाचा हा दुटप्पी पणा फक्त गरिबांसाठीच व ग्रामीण जनतेसाठीच  का ? शहरी लोकांना वेगळा न्याय व ग्रामीण जनतेची पिळवणूक का ? आजही भारत दोन टप्प्यात विभागला गेला असून ग्रामीण व शहरी न्याय व्यवस्थेत तफावत दिसून येते .या सर्व प्रकरणावरून आजही शासनाच्या व लोकप्रतिनिधी यांच्या अनास्थेमुळे गरीब दिन दुबळी जनता भरडली जात आहे.

तर एकीकडे लाखो ,करोडोचा महसूल बुडवत  बैलगाडीच्या नावाने रेती वाहणारे ठेकेदार मात्र आजही कारवाई पासून वंचित असल्याचे चित्र तालुक्यात आहे.अमळनेर महसूल प्रशासन  या ठेकेदारावर कारवाई करेल का ? याकडे जनतेचे लक्ष असेल.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध