Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १६ मे, २०२१
दहिवद येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...!
प्रतिनिधी शिरपुर:संपूर्ण देशात थयमान माजवनारा कोविड 19 मानव जातीला नाकीनऊ करीत गेल्या पंधरा महिन्यांपासून कोरोना विषाणू ने हाहाकार माजविला असून मानवी जीवन संकटात सापडले आहे.जगातील वैज्ञानिक अहोरात्र मेहनत करून या संकटातून सुटका कशी करून घ्यायची हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
अशात समाजातील कितीतरी प्रतिभावंत,, कलाकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील चांगल्या लोकांना कोरोनाने आपल्या कवेत घेऊन समाज मन सुन्न केले आहे.या कोरोना महामारीत एक आशेचा किरण म्हणजे कोरोना प्रतिबंधक लसी कडे पाहील जात आहे.मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून कोरोनाचा नायनाट करून मात करणे आणि हाच उद्देश मनात घेऊन दहिवद ग्रामपंचायती ने दहिवद गावात लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. मागील महिन्यात पाच एप्रिल पासून गावाचे सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी यांच्या माध्यमातून हजार च्या वर नागरिकांना लसीकरन करून देण्यात आल्या आहेत.आणि गावातील नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे.
आता आज पंधरा मे पासून ज्या ग्रामस्थांनी लसीचा पहिला डोस घेतला असून आता ज्यांना दुसरा डोस घ्यावयाचा आहे अशा नागरिकांना दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात दहिवद गावातील माजी सरपंच व आताचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री.एल.बी.पाटील(शेखर सर ) यांनी पुढाकार घेऊन गावातील नागरिकांना ही सेवा सुरू करून दिली आहे.
या कामी प्रा.आ.केंद्र रोहिणी चे वैद्यकीय अधिकारी राष्ट्रपाल अहिरे,डॉ.प्रविण गिरासे,
डॉ.डिंगबर,डॉ.अनिल मराठे, सिस्टर सौ.एस.टी.नाईक,सिस्टर सौ.जे.वाय.मोरे, (ओ.एन.एम.जे.के.पाडवी,ग्रा.प.सदस्य रणदिवे राजेंद्र,माजी उपसरपंच रविंद्र जाधव,सामाजिक कार्यकर्तेेे प्रल्हाद व दहिवद गावाचे पोलीस पाटील चव्हाण, मुख्याध्यापक निंबा पवार,माजी ग्रा.प.सदस्य शरद बागुल,जयवंत शिसोदे,यासह दहिवद गावाचे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.तसेच दहिवद गावाचे पदाधिकारी सरपंच व पोलीस पाटील हेंमन पाटील दादा देवरे ,ग्रामपंचायत सदस्य यांनी खुप सहकार्य लाभले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा