Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ११ जून, २०२१
Home
/
Unlabelled
/
गटविकास अधिकारी अमळनेर यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाईची प्रहार जनशक्ती पक्षाचे पंकज पाटील यांची मागणी..!
गटविकास अधिकारी अमळनेर यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाईची प्रहार जनशक्ती पक्षाचे पंकज पाटील यांची मागणी..!
तरुण गर्जना बातमी:अमळनेर तालुक्यातील नगाव बु.व नगाव खु.येथील तत्कालीन ग्रामसेवक के.आर.देसले यांनी गावी ग्रामसभा व मासिक सभा घेतलेल्या नसल्याने, तसेच विविध योजनेच्या निधीच्या खर्चाची मंजुरी ग्रामसभेत न घेता परस्पर शासकीय निधीची विल्हेवाट लावली असल्याने त्यांना शासकीय सेवेतून कायमस्वरूपी बदतर्फे करण्यात यावे व शासकीय निधीचा अपहार निश्चित करून रक्कम वसूल करण्यात यावी यासाठी तक्रारार करण्यात आली होती .
सदर प्रकरणात पंचायत समिती विस्तार अधिकारी अ.भा.राणे यांनी चौकशी अहवाल सादर केला.चौकशी अहवालात गंभीर स्वरूपाचे दोष आढळून आलेत तत्कालीन वेळी नगाव बु.व नगाव खु.गावी ग्रामसभा न घेणे ,ग्रामसभा व मासीक सभेचे इतिवृत्त नोंदवही बंद न करणे,कोरम पूर्ण नसताना सभा घेवून इतिवृत्त न लिहिणे, ग्रामसभेत विविध योजनांच्या जमा खर्चाची मंजुरी न घेणे या कारणे के.आर.देसले हे महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ नुसार शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र ठरतात असे मत मांडून कारवाईसाठी गटविकास अधिकारी शशी सोनवणे यांच्याकडे २० मे २०२१ रोजी सादर केलेले असताना देखील हेतू पुरस्कर गट विकास अधिकारी अमळनेर हे शासकीय कामांत हलगर्जीपणा व हयगय करत असल्याचे दिसून आले.
कायद्या नुसार अश्या स्वरूपाच्या गंभीर तक्रारी मध्ये एक महिन्याच्या आत चौकशी करून निर्णय देणे कायद्याने बंधनकारक होते .पंकज पाटील यांनी तक्रारार करून तीन महिने झाल्यावर देखील अमळनेरचे गटविकास अधिकारी यांनी उचित कारवाई केलेली नाही .
शासकीय कामांत हलगर्जीपणा व मुदतीत तक्रारीची चौकशी करून निर्णय तत्कालीन गट विकास अधिकारी यांनी दिलेला नाही .ही बाब पुराव्यानिशी व शासन परिपत्रकातील कायद्याचा आधार घेत तक्रारारदार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी,जळगांव यांच्याकडे लक्षात आणून दिली असून अमळनेरचे तत्कालीन गट विकास अधिकारी शशी सोनवणे यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाईची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांनी केली आहे .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा