Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १९ जून, २०२१
Home
/
Unlabelled
/
सरपंच सेवा महासंघ शिरपुर तालुकाध्यक्ष पदी उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांची नियुक्ती..!
सरपंच सेवा महासंघ शिरपुर तालुकाध्यक्ष पदी उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांची नियुक्ती..!
सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याचे शिरपुर तालुकाध्यक्ष पदी बोरगाव ता शिरपुर जि धुळे येथील उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांची नियुक्ती सरपंच सेवा महासंघाचे संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे पाटील व राज्य सोशल मिडीया अध्यक्ष भाऊसाहेब कळसकर, संपर्क राज्य प्रमुख राहुल उके यांनी केली.
सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य ही सरपंच यांचे न्याय, हक्क व मागणीसाठी राज्यभर कामकाज करणारी नोंदणीकृत सरपंच संघटना आहे. संघटनेने शासन दरबारी केलेल्या सरपंच मानधनवाढ सारख्या अनेक मागण्या मान्य झालेल्या आहेत.
नवनियुक्त तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या निवडी बद्दल माजी शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा,भुपेशभाई पटेल, जि प अध्यक्ष डॉ तुषार रंधे, अशोक कलाल, प्रभाकर चव्हाण, कृऊबा सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया,युवा नेते चिंतनभाई पटेल,बोराडी चे उपसरपंच राहुल रंधे, शिसाका संचालक भरत भिलाजी पाटील, मा पं स उपसभापती जगतसिंग राजपूत यांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, राज्य सोशल मिडीया अध्यक्ष भाऊसाहेब कळसकर, राज्य संपर्क प्रमुख राहुल उके, राज्य महीला उपाध्यक्ष वंदनाताई गुंजाळ, सरपंच माझा चॅनल संचालक रामनाथ बोराडे, धुळे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, उपाध्यक्ष सचिन राजपूत यांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा