Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १७ जून, २०२१
हरविलेले पैश्यांचे पाकीट केले परत; शेटे परिवारातील पिता-पुत्रांचा प्रमाणिकपणा
शिरपूर प्रतिनिधी: शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथील गौ रक्षक धुळे जिल्हा अध्यक्ष चेतन राजपूत हे काही कामानिमित्त शिरपूर पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या झेरॉक्सच्या दुकानात झेरॉक्स करण्यासाठी गेले असता तेथे त्यांचे पैश्यांचे पाकीट पडले. पाकीट पडल्याचे त्यांच्या लक्षात त्यावेळी आले नाही.
तेथील झेरॉक्सचे काम आटोपून ते पुढील कामासाठी रवाना झाले. काही वेळात ते पाकीट शेजारील दुकानदार कृष्णा पान कॉर्नरचे मालक बळीराम श्रावण शेटे व त्यांचा मुलगा हेमराज बळीराम शेटे आणि त्यांचे जावाई प्रकाश मंगा भदाणे यांना सापडले. त्यांनी पाकीट मालकाचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही.
त्यानंतर त्यांनी ते पाकीट उघडून पाहीले असता त्यात काही कागद,गौ रक्षक समितीचे व्हिजीटींग कार्ड व रुपये तीन हजार अशी रक्कम असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या व्हिजीटींग कार्डवर असलेल्या नंबरवर कॉल केला असता लागला नाही. काही वेळानंतर चेतन राजपूत यांना आपले पाकीट हरवल्याचे लक्षात आले. त्यांनी तरुण गर्जनाचे संपादक संतोष भोई व दै.तरुण भारतचे प्रतिनिधी मनोज भावसार यांना फोनवरुन सांगितले असता त्यांनी लागलीच जावून सांगितलेल्या दुकानाजवळ शोधाशोध सुरु केली.
कृष्णा पान कॉर्नरचे मालक बळीराम शेटे यांनी मला ते पाकीट सापडल्याचे सांगितले. तितक्यात तेथे चेतन राजपूत आले असता ते पाकीट बळीराम श्रावण शेटे व त्यांचा मुलगा हेमराज बळीराम शेटे यांनी त्यांना प्रामाणिकपणे परत केले. आपले पाकीट परत मिळाल्याचे समाधान चेतन राजपूत यांना झाल्याने त्यांनी कृष्णा पान कॉर्नरचे मालक बळीराम श्रावण शेटे व त्यांचा मुलगा हेमराज बळीराम शेटे यांना धन्यवाद केले. आजच्या युगात प्रामाणिक लोक आहेत याची पुन: प्रचिती आली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा