Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २४ जून, २०२१
वटसावित्री पोर्णिमेनिम्मित महिलांनी वडाचे झाड लावून केले पूजन..!
शिंदखेडा प्रतिनिधी: दि.24 रोजी वटसावित्री पोर्णिमेनिम्मित साईनगर येथील महिलांनी वडाचे झाड लावून पूजन केले. व संगोपणाची जबाबदारी घेतली.
वटसावित्री पोर्णिमेचे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. साईनगर येथील महिलांनी या दिवशी साईलीलानगर येथील गार्डन मध्ये वडाचे झाड लावले.संगोपनाची जबाबदारी घेतली. वटपौर्णिमेचा खरा संदेश वडाची पुजा यासाठी आहे की, या विचारातुन वृक्ष संवर्धन व्हावे व पर्यायाने पर्यावरणाची जोपासना होऊन निर्सगाचा समतोल राखला जावा यासाठी केले जाते.
दर वर्षी वडाचे झाड लावण्याचा संकल्प करून विधिवत पूजन केले. वृक्ष संवर्धन समितीने वडाचे रोप उपलब्ध करून दिले.
यावेळी रत्नाबाई देविदास चौधरी, सारिका विनोद चौधरी,रुपाली योगेश चौधरी, बेबाबाई देविदास पाटील, निर्मालाबाई देविदास मराठे,पूनम सचिन पाटील, राणी डिगंबर पाटील,प्रतिभा प्रवीण मराठे सह आदी महिला उपस्थित होत्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा