Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २४ जून, २०२१
आरक्षण साठी भोई समाज सेना तर्फे निवेदन..!
शिरपूर प्रतिनिधी:१९३६ ते १९५० या काळात भोई समाज हा अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट होता.इंग्रजांच्या काळात क्रिमिनल ट्राईब्ज ॲक्ट या गुन्हेगारी कायद्याखाली भोई समाजाने हालअपेष्टा सहन केल्या.परंतु १९५० नंतर जातींची पुनर्रचना करतांना भोई समाजाला कुठलेही आरक्षण न देता चुकून ओपन मध्ये टाकले गेले. त्यानंतर भोई समाजाला १९७४ मध्ये एनटी ब चे २.५% तोकडे आरक्षण देण्यात आले आणि त्यांच्या या आरक्षणावरही नेहमीच गदा येत असते. शासन ऊठसूट याच प्रवर्गात नवीन जातींना समाविष्ट करत असते.
आज दिनांक 24 जून रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष मा.नाना पटोले यांची शिरपूर दौऱ्यात भेट घेऊन भोई समाज सेना तर्फे भोई समाज आरक्षण साठी निवेदन देण्यात आले.यावेळी भोई समाज सेना प्रदेश उपाध्यक्ष पूनमचंदभाऊ मोरे, धुळे जिल्हा अध्यक्ष अशितोष वाडीले, शिरपूर तालुका अध्यक्ष चंद्रकांत वाडीले तसेच आण्णा भोई, पिटु भोई,अनिल भोई आदी पदाधिकारी उपस्थित होते.मा. नाना पटोले यांनी पूर्ण म्हणणे ऐकून घेतले व योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा