Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १३ जून, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील गोशाळेंचा कमाईचा गोरख धंदा पोलीसांमार्फत जमा केलेले गुरे, ढोरे व गायी जातात कुठे ?
शिरपूर तालुक्यातील गोशाळेंचा कमाईचा गोरख धंदा पोलीसांमार्फत जमा केलेले गुरे, ढोरे व गायी जातात कुठे ?
शिरपूर प्रतिनिधी:सरकारने गोवंश हत्याबंदीचा कायदा केला. गाय कामधेनू आहे, तिला मातेचे स्थान दिले आहे, त्यामुळे तिची हत्या करू नये, यासाठी हा कायदा केला गेला. त्याचे स्वागतही झाले. कधीकाळी कत्तलखात्याकडे जाणा-या गुरे, ढोरे व गायींना आता गोशाळेचा मार्ग दाखवला जात आहे पण त्याने प्रश्न सुटला आहे का? शिरपूर तालुक्यात अश्या अवैधरित्या कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गायींची सुटका गोरक्षक व शिरपूर पोलीस स्टेशनमार्फत केली जाते व त्या गायींना संगोपनासाठी तालुक्यातील विविध गोशाळांना दिली जातात.
गायींना गोशाळेत पाठविण्याचा उद्देश हा की, गायींना चांगल्या रितीने सांभाळ व पुरेसे अन्न मिळावे व त्यांचा सांभाळ व्हावा. परंतू शिरपूर तालुक्यातील गोशाळा चालकांनी यावर कमाईचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गोरक्षक व पोलीसांतर्फे मिळालेल्या गायींना सांभाळ न करता त्यांना खावू न घालता दोन ते तीन दिवसातच स्वतःच्या स्वार्थासाठी व कमाईच्या उद्देशाने कसायांना विकण्याचा गोरख धंदा सुरु केलेला आहे. आपल्याकडे एक म्हण आहे.. आगीतून निघाला आणि फफूट्यात पडला तसली गत आज गायींची होत आहे.
गोशाळा चालकांनी असे कृत्य करतांना कसलीही तमा बाळगलेली नाही. कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गायींची सुटका गोरक्षक व पोलीसांमार्फत जीवाची पर्वा न करता करीत असतात. गायींना सुखरुपपणे सोडविण्याच्या पोलीसांकडून गोशाळा चालकांना मिळालेल्या गायी जणू आयत्या पीठावर रेघाट्या मारायला मिळत असल्यामुळे ते आता निर्धास्तपणे त्या गायींना कसायांना विकून आपला खिसा गरम करत आहेत.
आता पावेतो गोरक्षक व पोलीसांतर्फे कित्येक गायी शिरपूर तालुक्यातील गोशाळांना दिल्या गेलेल्या असतांना आज जर बघायला गेलेत तर त्या गोशाळांमध्ये जेमतेम दोन ते तीन गायी निदर्शनास येतात मग दिलेल्या इतक्या गायी गेल्या कुठे? असा प्रश्न पडतो.
पोलीसांनी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गायी पकडून त्यांना परत कत्तलखान्याकडे जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या गोशाळा चालकांवर कारवाई व्हायला हवी व त्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी असे गोरक्षकांचे म्हणने असतांना त्यावर दुर्लक्ष केले जात आहे.
मा.पोलीस निरीक्षक साहेबांना विनंती आहे की,अश्या कत्तलखान्याकडे जाणाऱ्या असंख्य गायींची नोंद आपल्या दप्तरी ठेवल्यास व कोणत्या गोशाळा, पांजरापोळ धारकांना किती गायी दिल्या व त्यांची संपूर्ण बेरीज बरोबर आहे का यांची चौकशी आपल्या स्तरावरुन दर महिण्यास करण्यात यावी. जर गोशाळेत एखाद्या गायीचा खरोरच नैसर्गीकरित्या मृत्यू झाला असेल तर अश्या गायींची शासनमान्य गुरांच्या दवाखान्यातून मृत्यु दाखला पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याची तरतूद करण्यात यावी अशी गोरक्षकांची मागणी आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा