शिरपूर (प्रतिनिधी) दि.१३ रोजी तरुन गर्जना या वृत्तपत्रात शिरपूर तालुक्यातील गोशाळांचा कमाईचा गोरखधंदा या मथळ्याखाली आम्ही बातमी प्रकाशित केली असता अनेक वाचकांच्या आम्हास प्रत्यक्ष भेटून व फोनवरून प्रतिक्रीया मिळालेल्या असून वाचकांनी तालुक्यातील गोशाळेतील गोरखधंद्याबाबत बातमी प्रकाशित करुन सत्य उजेडात आणल्याबद्दल आम्हास एक प्रकारची एनर्जी, प्रेरणा देण्याचे काम केले त्याबद्दल त्या सर्व वाचकांचे आम्ही आभार मानतो. आमच्या असंख्य वाचकांना आम्ही सांगू इच्छितो की, आता माघार नाही.या गोशाळा चालकांचा अवैधपणे चालणाऱ्या गोरखधंद्यातील प्रकरणांचा आम्ही भांडाफोड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही...
शिरपूर तालुक्यात अनेक गोशाळा आहे. यापैकी काही खाजगी आणि इतर काही नोंदणीकृत गोशाळा फक्त शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान लाटण्यासाठी कागदोपत्री कार्यरत आहे. यांच्या काही गोशाळा मधील गायी प्रत्यक्ष बघितल्या असता गाईची अत्यंत दुरावस्था झालेली दिसून येत आहे. गोशाळेला आता धंद्याचे स्वरुप प्राप्त झाले असून गोरक्षक व पोलीसांनी अवैधमार्गाने जाणाऱ्या गाड्यांमधून पकडून आणलेल्या त्या गुरे, ढोर व गायींना चांगले सांभाळ करण्यासाठी गोशाळेला दिल्यानंतर तीन ते चार दिवसातच सर्रासपणे कसायांना विकून आपले आर्थिक हित जोपासत आहे.
गोशाळेसाठी शासनाने मान्यता दिली असतांना कोणत्याही प्रकारची शासनाच्या नियमांची अंमलबजावणी न करता त्या गोशाळांमध्ये गुरे,ढोरे व गायींना सर्रासपणे कसायांना विकून आपले खिसे भरण्याचे महापाप हे गोशाळा चालक करीत आहेत. यावर आता पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असून अश्या गोशाळा चालकांवर कायदेशिर कारवाई करून त्यांना मिळालेली शासनमान्यता रद्द करावी असे गोरक्षकांकडून बोलले जात आहे.
शिरपूर तालुक्यातील अनेक गोशाळा चालकांनी प्रख्यात संत महंतासह जय श्रीकृष्ण,जय गोमाता,गायत्री,बिजासनी माता,ओमसाई,भुयारेश्वर इत्यादी अधिक लक्षवेधी नावे देऊन गोशाळांची नोंदणी केलेली आहे त्या संत महंत व देवी देवतांच्या आदर्शावर गोशाळा चालक चालत आहेत का? असे अवैधरित्या गोशाळा चालक गुरे, ढोरे व गायींना परस्पर विकून अश्या गोशाळेचे कार्य हे कौतुकास्पद म्हणावे का? गो संवर्धन तथा गाईचे अस्तित्व राखण्यासाठी त्यांचे कार्य महान आहे का? असा प्रश्न गोरक्षकांना पडला आहे. गोशाळेत गाईंना चारा पाणी मिळतो किंवा नाही पशुवैद्यक अधिकाऱ्यांकडून आरोग्याची तपासणी केली जाते किंवा नाही ? गोशाळांवर कोणाचे नियंत्रण आहे किंवा नाही ? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित होत.
असून काही गोशाळा चालक संबंधित हे फक्त शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान प्राप्त करण्यासाठी कागद पत्र रंगवीत असल्याचे गोरक्षकांकडून अनेक तक्रारी आहेत, गाईची तस्करी करणारे, गाईची कत्तल करणारे यांच्याशी सुद्धा या काही गोशाळा चालकांचे संबंध आहेत का? याची वरिष्ठ स्तरावरून व समाजसेवी संस्था , संघटना, गोरक्षा करणाऱ्या सेवकांनी चौकशी करावी अशी मागणी होत आहे. (तालुक्यातील गोशाळांचा सविस्तर लेखाजोखा वाचा पुढील अंकात)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा