Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १९ जून, २०२१
शाळा सुरु झाली
शिक्षक आले दोन
शिकवणार शिकणार कोण
मुलं नाहीत पण .
शाळेत पसरली घाण
गुरुजी दिसताय छान
आहे त्यांना मान
शिकवता ऑनलाईन पण .
मुलं नुसतीच खेळकर
पुसली गेली बुद्धिमत्ता
लवकर सुरु होवो
पुढच्या गेलेत ई यत्ता.
कोरोनाने केला कहर
भविष्याचा गेला बहर
शाळा नाहीतर शिकायला
कशी येणार सर.
येणारी उज्वल पिढी
बांधतेय मनानं माडी
सोशल मीडिया वर
झालीत मोबाईल वेडी.
जनता आहे भोळी
सरकार आहेत खुळी
चिंता नाही भविष्याची
नुसतीच राजकारणात वेडी.
सुरु व्हाव्यात लवकर
दिसु दया पाठी
पाटी पुस्तकं दप्तरं
मुलं जरी छोटी.
शिक्षण महत्वाचं आहे
जाणुन निर्णय घ्या
घंटा खणखणु दया
मुलांना शाळेत घ्या.
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा
जिल्हा जळगाव
मोबाईल 9922239055©️®️
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा