Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १० जून, २०२१
Home
/
Unlabelled
/
लोहारा सुकीनदीच्या घाटात मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले. घाटाच्या दुर्दशेला बेजबाबदार अधिकारी ,लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांमुळे लागले डांबरीकरणाचे ग्रहण..
लोहारा सुकीनदीच्या घाटात मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले. घाटाच्या दुर्दशेला बेजबाबदार अधिकारी ,लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांमुळे लागले डांबरीकरणाचे ग्रहण..
जळगाव प्रतिनिधी( हमीद तडवी)रावेर तालुक्यातील लोहारा हे गाव सातपुडा पायथ्याशी वसलेले आदिवासी गाव म्हणून परिचित आहे,या गावाजवळ महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभागाचे सुकी धरण सातपुड्याच्या कुशीत असल्याने हे लोहारा गाव महाराष्ट्राच्या नकाशात प्रसिद्ध स्थळ म्हणुन परिचित आहे.
तर या सातपुडा जंगलातील सुकी धरण हे पर्यटन स्थळ बघण्यासाठी महाराष्ट्रातून विविध ठिकाणांहुन पर्यटक हे लोहारा गावाहुनच प्रवास करीत असतात,नेहमी वाहनांची वर्दळ व येजा सुरु असते त्यामुळे येथील सुकी नदीच्या घाटात वाहनांची नेहमी वर्दळ असते,त्याचबरोबर लोहारा शेतीशिवारात केळी ,हळद ,कापुस हे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते यामुळे शेतकऱ्यांच्या वाहनांची वर्दळ,मजुर कामगारांची वर्दळ,शेतकऱ्यांच्या बैलगाड्या अशा अनेक चारचाकी,दुचाकी वाहनांसह मोठ्या वाहनांची देखील वर्दळ असते या खड्ड्यामय रस्त्यामुळे व सुकी नदीच्या घाटाच्या खड्ड्यांमुळे अनेकांची डोके फुटली आहेत, के
या घाटात अनेकांचे अपघात होऊन अनेकजण जख्मी झाले आहेत अशा ह्या घटनांना जबाबदार कोण असा सवाल परिसरातील जनतेने उपस्थित केला आहे अशा ह्या वारंवार घटनांचा संपुर्ण प्रकार बांधकाम विभागाच्या अधिकारी व आमदार खासदार,संबधित मंञी यांना माहिती असल्यावरही जाणीवपुर्वक दुर्लक्ष व यांच्यामधे तेरी भी चुप और मेरी भी चुप असल्याकारणाने लोहारा घाटात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहेत,मागील सहा महिन्यांच्या कालावधीत देखील ह्याच सुकीनदीच्या घाटात कुंभारखेडा येथील मजुर महिलांचे ट्रक्टर सुद्धा पलटी झाले होते,माञ सुदैवाने जीवीतहानी टळली होती ,तरी जेणे करुन अपघात होऊन जीवीत हानी होणार नाही. याकडे संबधितांनी जातीने व गांभीर्याने लक्ष देऊन कुंभकर्णाची झोप दुर करुन तात्काळ सुकी नदीच्या घाटाचे नव्याने डांबरीकरण करावे व सर्वसामान्य जनतेसह वाहनधारकांचे होणारे अपघात थांबवावे अशी रास्त स्वरुपाची मागणी परिरातील जनतेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.
तसेच ह्या सुकी नदीच्या घाटाचे डांबरीकरण न केल्यास रास्ता रोको आंदोलन व येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा लोहारा ,कुसूंबा,कुंभारखेडा चिनावल सह आजुबाजुच्या गावकऱ्यांनी ,शेतकऱ्यांनी,मजुरांनी व महिलांनी या प्रसिद्धी पञकाद्वारे संबधित शासन प्रशासनाला दिला आहे.संबधितांनो जागे व्हा, जागे व्हा..अन्यथा आंदोलन नक्की धेडणार...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा