Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १७ जुलै, २०२१
जेष्ठ नागरीकांच्या सेवेसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध : सुंदरसिंग वसावे
राज्यात जेष्ठ नागरीकांच्या विविध समस्या निवारणासाठी राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फौडेंशन पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने राष्ट्रीय हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १४५६७ सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जेष्ठ नागरीकांनी गरज भसल्यास या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय भारत यांच्या मार्फत देशातील जेष्ठ नागरीकांच्या तक्रार निवारण करीता ही राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. याकरीता जिल्हा स्तरावर क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, जिल्ह्यातील नागरीकांना कोणतीही वृध्द व्यक्ती बेघर असल्याचे अढळल्यास त्यांना वेळेत मदत मिळावी या करीता तसेच जेष्ठ नागरीकांना काही समस्या किंवा तक्रार करावयाची असल्यास सदर हेल्पलाईन क्रमांक १४५६७ यावर संपर्क साधावा. असेही सहाय्यक आयुक्त श्री. वसावे यांनी कळविले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा