Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २० जुलै, २०२१

रामी-पथारे परीसरातील मुरूम माफीयांची नंदुरबार रस्त्यावरील असलेले रामीच्या महादेव मंदिरावर गुप्त बैठक संपन्न..!



शिंदखेडा तालुक्यातील रामी-पथारे धावडे परीसरातील असलेल्या काही खासगी तर काही सरकारी आद्दीतील मुरूम जातोय तरी कुठे ? या परीसरात दोन गट मुरूम चोरायला तयार करण्यात आले आहेत एका गटात एक जेसीबी व ९ ट्रॅक्टर तर दुसऱ्या गटात एक जेसीबी व ८ ट्रॅक्टर आहेत या दोन्ही गटात भाव कमी जास्त केल्याने वाद निर्माण झालेले आहेत तर यासाठी नंदुरबार रस्त्यावरील असलेले रामीच्या महादेव मंदिरावर दोन्ही गट एकत्र येऊन बैठक घेऊन चहा चा अस्वाद घेऊन समजूत करण्यात आली. 

यात दोन्ही गट तर रामी-पथारे येथील काही ग्रामस्थ देखील उपस्थित होते यावेळी तहसीलदार यांना कसे मॅनेज करावे व यानंतर कोणीही मुरूम चा भाव कमी जास्त करू नये आपण सर्व एकत्र येऊन परीसरातील सर्व मुरूम संपविण्याचा निर्धार घेऊया कोणीही आप आपल्यात वाद करू नये वाद केल्याने दुसऱ्या व्यक्तीचा फायदा होईल असे बैठकीत विषय घेण्यात आले आता तहसीलदार साहेब या कडे काय लक्ष देतात ? असे जनता आस धरून बसले आहेत गुप्त बैठक सुरू असताना रामी येथील एक जागृत तरूणाने धाव घेऊन विडिओ क्लिप बनविण्याचा प्रयत्न केला त्या तरूणावर जेसीबी चे मालक तामथरे येथील रहीवासी यांच्या मुलाने त्या तरूणावर धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत उडवाउडवीची भाषा केली मग या मुरूम चोरट्यांना संबधित अधिकार्यांची साथ असू शकते असा प्रश्न जनतेच्या मनात सुरू आहे दिवसरात्र अवैध रित्या मुरूम जातोय तरी याकडे लक्ष का नाही ? या मुरूम माफीयांना साथ तरी कोणाची ? या चोरट्यांना अधिकार्यांचा धाक नाही असे जगजाहीर झालेले दिसून येत आहे तरी संबधित अधिकार्यांनी याकडे लक्ष देऊन संबधित प्रकार बंद करावा अन्यथा याच्या पुढे मनसे विध्यार्थ्यी सेना शिंदखेडा तालुका तीव्र प्रकारचे आंदोलन छेदेल..!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध