Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

शिरपूर शहरातील कोळी इनामी जमीनीची बनावट कागदपत्रांद्वारे खरेदी विक्री करणाऱ्या 6 जनांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल



शिरपूर शहरातील कोळी इनामी जमीनीची बनावट कागदपत्रांद्वारे खरेदी विक्री करणाऱ्या 6 जनांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी व शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील सिटी सर्व्हे नं 1553 मधील 2115.4 चौ मी क्षेत्राची कोळी इनाम वर्ग 6 क ची नोंद असतांना  प्रभाकर गुलाब कोळी, बन्सीलाल ओंकार ईशी दोघे रा.अंतुली,गोपाल भिकचंद अग्रवाल, केशव वेडू सावळे दोघे रा.शिरपूर,रविंद्र इंधन सावळे रा.वरुळ,व भुमिअभिलेख कार्यालय शिरपुर जि.धुळे येथील तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून मे 2012 पूर्वीपासून ते आजपर्यंत वेळोवेळी बनावट कागदपत्रे तयार करीत कोणताही अधिकार नसतांना मोठ्या रकमेचा खरेदी विक्रीचा व्यवहार करून फिर्यादी व शासनाची फसवणूक केल्याची तक्रार दगडू न्हानू कोळी रा.वरवाडे हल्ली चांदगड ता.शिंदखेडा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली होती.सदर तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आदेश दिल्याने शहर पोलीस ठाण्यात वरील सर्व संशयितांविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख करीत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध