Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
नंदुरबार जवळील जामदे गावामध्ये चालू कीर्तनात हभप ताजोद्दिन महाराज शेख यांचे देहावसान! शुर ओळखावा रणी,साधू ओळखावा मरणी
नंदुरबार जवळील जामदे गावामध्ये चालू कीर्तनात हभप ताजोद्दिन महाराज शेख यांचे देहावसान! शुर ओळखावा रणी,साधू ओळखावा मरणी
धुळे साक्री प्रतिनिधी :औरंगाबाद येथील रहीवासी थोर कीर्तनकार ह.भ.प.ताजोद्दीन महाराज शेख यांनी काल नंदुरबार येथे जामदे गावांमधील अखंड हरिनाम सप्ताह मध्ये किर्तन सुरु असतानाच देह ठेऊन जगाचा निरोप घेतला
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कर्तनाची ह-भ-प तजोद्दिन महाराज शेख हे मुस्लीम असताना कट्टर हिंदू प्रेमी होते त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांच्या मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये कीर्तने केली होती शिवसेनेचे प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा अनेक कार्यक्रमात ह.भ.प.ताजोद्दीन महाराज शेख यांनी आपले किर्तन केले असल्याचे त्यांच्या अनुयायांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना ह.भ.प. शेटे महाराज म्हणाले की, ह.भ.प.ताजोद्दीन महाराज यांचा जन्म जरी मुस्लीम समाजात झाला असला तरी त्यांनी किर्तनाच्या माध्यमातुन हिंदु धर्माचा प्रसार आणि प्रचार केला ह.भ.प.ताजोद्दीन महाराज नेहमीच किर्तनात सांगत असे विश्वात हिंदू धर्मा सारखा श्रेष्ठ कोणता धर्म नाही,वारकरी सांप्रदायासारखा सांप्रदाय नाही,गिता, भागवता , गाथा, ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ नाही एवढेच नव्हे तर हिंदु धर्मा ज्यांचा जन्मा झाला त्यांनी प्रत्येकांनी माळ घालायला पाहीजे असे आव्हान महाराज कीर्तनाच्या माध्यमातून नेहमी करत होते.
ह.भ.प.ताजोद्दीन महाराज यांच्या अचाणक जान्याने मोठी पोकळी निर्माण झाली मी विदर्भामध्ये महाराजांचे बरेच कीर्तनाचे कार्यक्रम घेतले आहेत महाराजांचा संभाजीनगर येथे फार मोठा आश्रम असून मनमिळावू स्वभाव, कट्टर हिंदुत्ववादी विचार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र व खडा पहाडी आवाज हे महाराजांचे वैशिष्ट होते
असं म्हणतात "शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी" भजन करत असताना मरण येणे हे फार मोठ्या साधूत्वाचे लक्षण आहे. नांदुरबार जवळील जांबे गावातील अखंड हरिनाम सप्ताह मध्ये कीर्तनातील विषय भजनाचा चालू होता. तुका म्हणे येथे भजन प्रमाण ,काय थोर पण जाळावेते हे प्रमाण चालू असताना अचानक महाराजांना चक्कर आल्यासारखे झाले. चालू किर्तनात खाली बसल्या नंतर हृदयविकाराच्या झटक्याने महाराजांना देवाज्ञा झाली. खऱ्या अर्थाने म्हणावे लागेल याज साठी केला होता अट्टाहास/ शेवटचा दीस गोड व्हावा
अशा या महान संत विभूतीला सर्व वारकरी सांप्रदायाच्या सर्व साधक मंडळींच्या वतीने व विश्व वारकरी सेनेच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावचे रहिवासी तथा काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते वाळू क्षिरसागर यांची नुकतीच काँग्रेस सेव...
-
जळगाव प्रतिनिधी:- नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हादरा बसला आहे. ज...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा