Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१
राजस्थान मध्ये ही मुख्यमंत्री बदलाचे संकेत सचिन पायलट होणार मुख्यमंत्री
भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही मुख्यमंत्री बदलण्याची मालिका सुरू केली आहे. नुकतेच पंजाबचे मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता राजस्थानमध्येही खांदेपालट होण्याची शक्यता आहे. राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सचिन पायलट यांच्याकडे येण्याची वर्तवली जात आहे. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जागी पायलट यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
काँग्रेस पक्षाकडे सध्या तरुण चेहऱ्यांची कमी आहे. ज्योतिरादित्य शिंदे, जतीन प्रसाद, सुष्मिता देव या तरुण नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे असंतुष्ट नेत्यांना दूर ठेवत काँग्रेस पक्षाची जबाबदारी पक्षातील तरुण नेतृत्वाकडे देण्याचे काँग्रेस हायकमांडने ठरवले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सचिन पायलट यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पायलट यांनाही कल्पना देण्यात आलेली आहे. मात्र ही जबाबदारी त्यांच्याकडे कधी येईल याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.
दरम्यान, काँग्रेसमधील तरुण नेत्यांची फळी कमी होत असतानाच गुजरात मधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी व बिहारचे जेएनयु विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार हे काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. लवकरच त्यांचा राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थिती प्रवेश सोहळा होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. जिग्नेश मेवाणी आणि कन्हैयाकुमार यांच्या माध्यमातून पक्षाला तरुण नेतृत्व मिळणार आहेत.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्स, टपऱ्या आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांवर शिरपूर शहर पोलिसांनी आता ...
-
बेटावद प्रतिनिधी :- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद हे गाव लोणच्यासाठी लागणाऱ्या कैरीच्या बाजारासाठी विशेष प्रसिद्ध आहे. सध्या येथे कैरी बाजारात...
-
अमळनेर-तालुक्यातील खापरखेडा प्र.डा.येथे व शहरातील पैलाड येथे अशा दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. खापरखेडा...
-
शिरपूर/ प्रतिनिधी तत्कालीन जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या कार्यकाळात धुळे जिल्ह्यात शालार्थ आयडी घोटाळा झाल्याचे आणि ...
-
अमळनेर : विना परवाना बैलांची कोंबून वाहतूक करणाऱ्या बेटावद येथील इसमाला वाहनासह चोपडा येथील गोरक्षकांनी तालुक्यातील झाडी येथे पकडून दोन बैल...
-
शिरपूर प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) केवळ छायाचित्रणातील सहभागापुरती मर्यादित नसून, जमिनी स्तरावर सक्रियपणे कार्यरत असल्याचे ...
-
आळे दि. १७ - आळे गावचे नविनियुक्त सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सखाराम(मुकुंद) भंडलकर यांचा रामोशी समाज बांधव व जय मल्हार क्रांती संघटना महाराष...
-
शिरपूर/ प्रतिनिधी शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेच्या हद्दीत स.नं. ६/१/ब/१/ब मध्ये स्थानिक पातळीवर माजी नगरसेवकाच्या मुलीने खुल्या जागेवर अतिक्रमण क...
-
अमळनेर : तालुक्यातील जळोद येथील दिलीप उत्तम ठाकरे (चौधरी) वय ५४ याने तुळशीराम हिलाल पाटील यांच्या शेतात निंबाच्या झाडाला दोरीने गळफास ...
-
शिरपूर/ प्रतिनिधी शिक्षण हे पवित्र क्षेत्र ओळखले जाते.परंतु या विभागातील शासकीय अधिकाऱ्यांनी भ्रष्ट मार्गाने धुळे जिल्ह्यात ४५० शालार्थ आयड...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा